विधान परिषद निवडणुकीतही आघाडीचा ‘कार्यक्रम’ होणार?; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुंबई तक

रात्रभर रंगलेल्या राज्यसभा निवडणुकीत अखेर भाजपने तिन्ही जागांवर विजय मिळवला. या विजयाने महाविकास आघाडीला झटका बसला असून, याचे विधान परिषद निवडणुकीवर काय परिणाम होतील याबद्दल चर्चा सुरू झालीये. या निवडणुकीत भाजपने पाच उमेदवार दिलेले आहेत. या निवडणुकीत पाचवा उमेदवार निवडून येण्याबद्दल फडणवीसांनी महत्त्वाचं भाष्य केलं. राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात विजयोत्सव साजरा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रात्रभर रंगलेल्या राज्यसभा निवडणुकीत अखेर भाजपने तिन्ही जागांवर विजय मिळवला. या विजयाने महाविकास आघाडीला झटका बसला असून, याचे विधान परिषद निवडणुकीवर काय परिणाम होतील याबद्दल चर्चा सुरू झालीये. या निवडणुकीत भाजपने पाच उमेदवार दिलेले आहेत. या निवडणुकीत पाचवा उमेदवार निवडून येण्याबद्दल फडणवीसांनी महत्त्वाचं भाष्य केलं.

राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“भाजपने तीन उमेदवार उभे केले होते. ज्यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्हाला ऑफर देण्यात आली की, तुम्ही तिसरा उमेदवार परत घ्या. तिकडे (विधान परिषद निवडणूक) आम्ही तुमचा पाचवा उमेदवार आहे, तिथे माघार घेऊ. त्यावेळी आम्ही त्यांना नम्रपणे सांगितलं होतं की, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. राज्यसभा सदस्य आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाचं धोरण मोदीजी तयार करतात. या सगळ्या धोरणात्मक बाबींमध्ये राज्यसभा सदस्य महत्त्वाचा घटक असल्यामुळे जसं तुम्ही सांगता त्याच्या उलट आपण करा.”

‘पराभवाने बावचळलेत, पिसाटलेत, काहींचे चेहरे पडले आहेत’; फडणवीसांचा रोख कोणाकडे?

हे वाचलं का?

    follow whatsapp