Maratha Reservation : मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही – संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा
राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमीत्ताने पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मराठा समाजाला वेठीस धरायचं काम करु नका, तुमच्या भांडणात आम्हाला रस नाही…आरक्षण कसं मिळेल तेवढंच सांगा. गरीब मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत संभाजीराजेंनी १६ जून ला कोल्हापुरात मोर्चाचं आयोजन करण्यात […]
ADVERTISEMENT
राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमीत्ताने पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मराठा समाजाला वेठीस धरायचं काम करु नका, तुमच्या भांडणात आम्हाला रस नाही…आरक्षण कसं मिळेल तेवढंच सांगा. गरीब मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत संभाजीराजेंनी १६ जून ला कोल्हापुरात मोर्चाचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
ADVERTISEMENT
Shivrajyabhishek Din 2021 : रायगडावर आई शिरकाईचा गोंधळ
संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते आज रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर संभाजीराजेंनी उपस्थितांशी संवाद साधत असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला घेरलं. शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीतील लोकांसाठी स्वराज्य निर्माण केलं. शाहु महाराजांनी पहिल्यांदा बहुजनांना आरक्षण दिलं. पण आज मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तर यावर आम्ही आवाज उठवायचा नाही का? असा सवाल संभाजीराजेंनी विचारला.
हे वाचलं का?
१६ जूनला सकल मराठा समाजातर्फे कोल्हापुरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात लोकप्रतिनिधी असोत किंवा आमदार-खासदार असोत त्यांनी येऊन मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल हे सांगावं. आम्हाला तुमच्या राजकारणात किंवा भांडणात जरासाही रस नाही. लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. मराठा समाजाला वेठीस ठरण्याचं काम करु नका. माझा लढा हा गरीब मराठा समाजासाठी आहे. १६ जूनचा मोर्चा झाला की मी स्वतः महाराष्ट्रात फिरणार असल्याचंही संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं.
आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळावरही संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली. निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज मागास नाही असं सांगत आरक्षण रद्द केलं. यानंतर मी राज्य सरकारला यासाठी ३ पर्याय सुचवले होते. विषय केंद्राचा असो किंवा राज्याचा आम्हाला फक्त आरक्षण कधी मिळणार एवढंच सांगा असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं. याचसोबत १६ जून पासूनच्या मोर्चातमध्ये मला किंवा कोणत्याही शिवभक्ताला कोविडचं कारण देऊन अडवण्याचा प्रयत्न करु नका असा इशाराही संभाजीराजेंनी दिला. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मराठा समाज मुंबईत येईल, तुम्हाला लाठी चालवायची असेल तर पहिले छत्रपतींच्या वंशजांवर चालवा आणि मग वाट्टेल ते करा असं म्हणत संभाजीराजेंनी राज्य सरकारला आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT