उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे म्हणून 6 कोटी 75 लाख वेळा रामजप; कोण आहे हा अवलिया शिवसैनिक?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबाद: जीवनात काही मिळवायचे असेल तर आपण देवाकडे साकडं घालतो. याचाच प्रत्यय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी आला आहे. जालना जिल्ह्यातील पांघरी येथील कट्टर शिवसैनिक अंकुश वाघ यांनी 2009 पासून रामनाम जप सुरू केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे याकरिता त्यांनी चक्क 6 कोटी 75 लाख वेळा श्री रामाचे नामस्मरण करत वहीत नोंद केली आहे. सभास्थळी फाटक्या कपड्यात आलेला हा शिवसैनिक सर्वांचे लक्ष केंद्रित वेधून घेत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेही त्याचा सन्मान करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे यासाठी 2019 विधानसभा निवडणुकीनंतर अनेक डावपेच आखले गेले. त्यानंतर अनपेक्षित रित्या ते मुख्यमंत्री झाले. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी जालना जिल्ह्यातील पांघरी येथील कट्टर शिवसैनिक अंकुश वाघ यांनी 2013 पासून त्यासाठी रामनाम जप सुरू केला. राम नामाचा जप करण्यासाठी विशेष वही असते. त्या वहीमध्ये त्यांनी रामाचे नामस्मरण लिहिण्यास सुरुवात केली. पाहता पाहता 6 कोटी 75 लाख वेळा रामाचे नाव त्यांनी लिहून काढले. पाच कोटींचा प्रण होता. मात्र उद्धव ठाकरे कायम मुख्यमंत्री रहावे म्हणून नामस्मरण सुरू ठेवले असून ते कायम सुरू राहील, असे शिवसैनिक अंकुश वाघ यांनी सांगितले आहे.

अंकुश वाघ यांनी रामनामाचा जप करत असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी कोविडमुळे मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही. मुंबईत जाऊन दोन वेळा परत आलो होतो. मात्र आता मुख्यमंत्री स्वतः सभेसाठी मराठवाड्यात आले आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी आमदार अंबादास दानवे यांनी बोलावले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून, रामाचे नामस्मरण लिहिलेल्या वह्या त्यांच्याकडे देणार आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला जातील त्यावेळी यांच्याहस्ते या वह्या प्रभु श्री रामाच्या चरणी जाव्यात, अशी मनोकामना अंकुश वाघ यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT