राष्ट्रवादीेने पत्ते उघडले; निंबाळकर, खडसेंची विधान परिषदेसाठी वर्णी
मुंबई: राज्यसभा निवडणूक येत्या १० तारखेला होणार आहे. राज्यात सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात आहेत. राज्यसभा निवडणुकांसोबतच राज्यात विधान परिषदेचीही निवडणूक आहे. शिवसेना, काँग्रेस, भाजप या पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांबाबत काही स्पष्टता नव्हती. आता राष्ट्रवादीनेही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली […]
ADVERTISEMENT
मुंबई: राज्यसभा निवडणूक येत्या १० तारखेला होणार आहे. राज्यात सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात आहेत. राज्यसभा निवडणुकांसोबतच राज्यात विधान परिषदेचीही निवडणूक आहे. शिवसेना, काँग्रेस, भाजप या पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांबाबत काही स्पष्टता नव्हती. आता राष्ट्रवादीनेही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे या दोघांना राष्ट्रवादीने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर एकनाथ खडसे यांना भाजपातून राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर मोठी लॉटरी लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे. @NCPspeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 9, 2022
भाजपाने विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची नावे कालच जाहीर केली आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राम शिंदे यांची नावे भाजपने जाहीर केली आहेत. तसेच सहाव्या जागेसाठीही भाजप उमेदवार देणार आहे. यासाठी सदाभाऊ खोत, हर्षवर्धन पाटील यांची नावे चर्चेत आहेत. भाजप सहावा उमेदवार देणार असल्याने आता निवडणुकीची रंगत आणखी वाढणार आहे. काँग्रेने भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांना उमेदावरी दिलेली आहे. तसेच शिवसेनेने सचिन अहिर, आमशा पाडवी यांना उमेदावारी दिलेली आहे.
दरम्यान एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. एकनाथ खडसे आणी रामराजे नाईक निबाळकरांना मोठा राजकीय अनुभव आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे सभापती म्हणूनही काम पाहिले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
राज्यात राज्यसभेसाठी आमदारांची जुळवाजुळव सुरु आहे. छोटे पक्ष, अपक्ष आमदार यांची मनधरणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी खरी चुरस शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडीक यांच्यात आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने आपले सर्व आमदार हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले आहेत.
ADVERTISEMENT