राणा दाम्पत्याचं ‘डी गँग’ कनेक्शन?; फडणवीसांच्या मौनावरून संजय राऊत कडाडले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं ‘डी’ गँगशी असलेलं कनेक्शन यावरुन शिवसेना नेते संजय राऊतांनी बरीच टीका केली आहे. एवढंच नव्हे तर अशा विषयात फडणवीस ज्या पद्धतीने बोलतात ते गप्प का बसले आहेत? असा सवाल करत राऊतांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

20-25 लाख रुपयांवरुन आमचे मंत्री तुरुंगात जातात मग ईडीने राणा दाम्पत्याची चौकशी का केली नाही? लकडावालाशी संबंधित सगळ्यांची चौकशी करण्यात आली पण राणा दाम्पत्याला का सोडण्यात आलं? असा सवाल विचारत राऊतांनी ईडीच्या एकूणच कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

‘मुंबईतील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न’

‘राणा दाम्पत्य जे आहे.. ते अचानक राम भक्त झालं, हनुमान भक्त झालं आणि त्या भक्तीत एवढे डुबले की, ते मुंबईत येऊन धिंगाणा करु लागले. मुंबईचं वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला.’

ADVERTISEMENT

‘मातोश्री’ला आव्हान देण्याचा प्रयत्न करु लागले. पण आता लक्षात असं आलंय तपासात की, राणा दाम्पत्य हे काही भोंगे प्रकरण सध्या सुरु आहे महाराष्ट्रात त्यामागे अंडरवर्ल्ड प्रकरण आहे.’

ADVERTISEMENT

‘जसं 1992 च्या दंगलीमध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन होतं, पाकिस्तान कनेक्शन होतं, डी गँग कनेक्शन होतं. मला आता असं दिसतंय आणि पोलिसांना देखील आता दिसायला लागलं आहे की, हे जे मागील 15 दिवसात वातावरण बिघडविण्याचा जो काही प्रयत्न दिसतोय.’

‘भोंगे प्रकरण, हनुमान चालीसा प्रकरण, मुंबईतील या घडणाऱ्या घडामोडी मागे नक्कीच डी गँग, अंडरवर्ल्ड यांचा पैसा काम करतोय.’ असा गंभीर आरोप केला.’

‘डी गँगचे आणि राणा दाम्पत्याचे आर्थिक हितसंबंध’

‘लकडावाला डी गँगचा मुख्य फायनान्सर होता जो ईडीच्या कोठडीमध्ये मरण पावला होता. त्या डी गँगचे आणि राणा दाम्पत्याचे आर्थिक हितसंबंध कसे आहेत? याचं फक्त एक लहानसं प्रकरण समोर आलं आहे. याची चौकशी का झाली नाही ईडीकडून?’

‘जर लकडावालाने मनी लाँड्रिंग केलेलं आहे आणि मनी लाँड्रिंगचा पैसा अनेक ठिकाणी फिरवलेला आहे. त्यातील एक लाभार्थी राणा दाम्पत्य हे 80 लाख रुपयांचं आहे. हे पैसे का घेतले हा तपासाचा भाग आहे. पण आंतरराष्ट्रीय गुन्हेगार त्याच्याकडून घेतलेल्या पैशाचा वापर कुठे झाला आणि फक्त एवढेच पैसे आहेत की, अजून काय व्यवहार आहेत याचा तपास सगळ्यात आधी मुंबईच्या EOW ने का केला नाही?’ असा खडा सवालही त्यांनी विचारला.

‘फक्त राणा दाम्पत्य यातून कसं काय सुटलं?’

‘कारण हा लकडावाला EOW च्या कस्टडीमध्येही होता. त्यानंतर तो ईडीच्या कस्टडीत गेला. या सगळ्याचा तपास होणं गरजेचं आहे. मनी लाँड्रिंगची ही फिट केस आहे राणा दाम्पत्यावर. जर आमच्यासारखे अनेक लोकं ईडीचे बळी ठरले आहेत.’

‘नवाब मलिक असतील, अनिल देशमुख असतील. अन्य लोकं असतील. मग फक्त राणा दाम्पत्य यातून कसं काय सुटू शकतं? त्यांना वाचवणाऱ्या कोणत्या आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत?’

‘हे फक्त एक प्रकरण समोर आलं आहे. अशी अनेक प्रकरणं माझ्याकडे आलेली आहेत. मी कालच ती मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह सुपूर्द केली आहेत.’ असंही राऊत यावेळी म्हणाले.

नवनीत राणांच्या अडचणी संजय राऊतांनी वाढवल्या?, शोधलं डी-गँग कनेक्शन

’20-25 लाखांसाठी आमच्या मंत्र्यांना तुरुंगात टाकता’

‘माझा प्रश्न ईडीला आहे की, तुम्ही 20-25 लाखांसाठी आमच्या मंत्र्यांना तुरुंगात टाकता. आमच्या प्रॉपर्टी जप्त करता. लकडावालाच्या खात्यातून जिथे-जिथे पैसे ट्रान्सफर झाले त्या सगळ्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. फक्त राणा दाम्पत्य का सुटलं?’

‘मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना देखील पत्र लिहून ही माहिती देणार आहे. की, तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहिले आहेत. या देशामध्ये अस्थितरता निर्माण करणारे. हा देश तोडू इच्छिणारे धर्माच्या नावावर त्यासाठी अंडरवर्ल्ड कनेक्शनचा वापर करणाऱ्या लोकांच्या बाजूने कोणत्या राजकीय पक्षाने उभं राहू नये. माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांना ते का गप्प बसले आहेत या विषयावर?’

‘आता या विषयावर सुद्धा इतर वेळेला भाजपचे लोकं बोलतात ना पोपटासारखे. मग अंडरवर्ल्ड कनेक्शन नवनीत राणाच्या खात्यावर जमा झालेले पैसे या संदर्भात भाजपने थातूरमातूर उत्तर न देता इतरांच्या बाबतीत ज्या प्रकारची भाषा वापरली ती आता वापरायला पाहिजे.’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर देखील यावेळी निशाणा साधला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT