Rana Couple: राणा दाम्पत्याला तूर्तास तुरुंगातच राहावं लागणार, कोर्टाकडून दिलासा नाहीच!
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी हनुमान चालीसा पठण प्रकरणी घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. ज्यानंतर त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या सगळ्यात जामीन मिळावा म्हणून राणा दाम्पत्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आज (26 एप्रिल) झालेल्या सुनावणीत राणा दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. कारण राणा […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी हनुमान चालीसा पठण प्रकरणी घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. ज्यानंतर त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या सगळ्यात जामीन मिळावा म्हणून राणा दाम्पत्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आज (26 एप्रिल) झालेल्या सुनावणीत राणा दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे.
कारण राणा दाम्पत्याच्या याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने सरकारला दिले आहेत. त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत राणा दाम्पत्याला तुरुंगातच राहावं लागणार आहे.
नेमकं काय घडलं कोर्टात?
आता त्यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार असून, तोपर्यंत दोघांनाही तुरुंगातच राहावे लागणार आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा, त्यांचे पती आणि आमदार रवी राणा हे याचिका रद्द व्हावी यासाठी काल (25 एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. मात्र इथे त्यांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे आज त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण इथेही त्यांना तात्काळ कोणताही दिलासा मिळालेला नाही.