रानू मंडल यांनी गायलं ‘मणिके मागे हिथे’; तुम्ही ऐकलंत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘मणिके मागे हिथे’ हे गाणं ऐकलं नसेल असा माणूस सापडणार नाही, असं म्हटलं तर वावगं ठरू नये; इतकं हे गाणं प्रसिद्ध झालं. योहानीच्या आवाजातील गाण्यानं देशाच्या सीमा तोंडून भारतात रसिकांची दाद मिळवली. अनेकांच्या तोंडीही या गाण्याचे बोल ऐकायला मिळतात आणि आता हे रानू मंडल यांनीही गायलं आहे. त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

ADVERTISEMENT

श्रीलंकेची नागरिक असलेल्या योहानी दिलोका डिसिल्वाच्या आवाजातील ‘मणिके मागे हिथे’ या गाण्यानं भारतात अक्षरशः धुमाकूळ घातला. यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि सोशल माध्यमं सगळीकडेच हे गाणं वाजताना दिसत आहे. या गाण्यामुळे योहानी भारतातही प्रसिद्ध झाली.

भारतीयांची प्रचंड दाद दिलेलं हे गाणं आता रानू मंडल यांनी गायलं आहे. मणिके मागे हिथे गाताना रानू मंडल यांचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘तेरी मेरी कहानी’ गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रानू मंडल होत्या. त्यानंतर त्यांच्यासोबत हिमेश रेशमियाने अल्बमही काढला.

हे वाचलं का?

दरम्यान, अल्बमनंतर रानू मंडल प्रसिद्धीच्या वलयातून बाहेर फेकल्या गेल्या. खूप दिवसानंतर त्यांचा गाणं गातानाचा व्हिडीओ समोर आला असून, तो लोकांना किती आवडतो? त्यावर रसिकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे बघणं मजेशीर ठरणार आहे.

दोन वर्षांपूर्वी रानू मंडल इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. लता मंगेशकर यांच्या सुरातील ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि रानू मंडळ एका रात्रीतून प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. पश्चिम बंगालमधील रणघाट रेल्वे स्टेशनवर राहणाऱ्या रानू मंडल यांना नंतर रिअॅलिटी शो मध्येही बोलावण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT