बिबट्यासारखा दिसणारा कुत्रा पाहून लोक झाले आवाक, सोशल मीडियावर तुफान चर्चा
कुत्रा म्हटलं की अनेक जण अनेक नावं सांगतील. कुणी सांगेल डॉबरमॅन, कुणी सांगेल अल्सेसिएशन, लॅब्रोडॉर अशी नावं सांगता येतील. मात्र चित्त्यासारखा दिसणारा कुत्रा असं कुणी सांगितलं तर? होय सोशल मीडियावर चित्त्यासारख्या दिसणाऱ्या कुत्र्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. Titus Dog म्हणजेच टायटस डॉग असं या कुत्र्याचं नाव आहे. तो दिसत बिबट्यासारखा असला तरीही तो कुत्रा आहे. […]
ADVERTISEMENT

कुत्रा म्हटलं की अनेक जण अनेक नावं सांगतील. कुणी सांगेल डॉबरमॅन, कुणी सांगेल अल्सेसिएशन, लॅब्रोडॉर अशी नावं सांगता येतील. मात्र चित्त्यासारखा दिसणारा कुत्रा असं कुणी सांगितलं तर? होय सोशल मीडियावर चित्त्यासारख्या दिसणाऱ्या कुत्र्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. Titus Dog म्हणजेच टायटस डॉग असं या कुत्र्याचं नाव आहे. तो दिसत बिबट्यासारखा असला तरीही तो कुत्रा आहे. टायटस डॉगबाबत लोकांना खूपच कमी माहिती आहे. मात्र सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत.
कुत्र्याचा हा अतिशय दुर्मिळ प्रकार आहे. हा कुत्रा चित्त्यासारखा दिसतो. सुरक्षेसाठी या कुत्र्यांचा वापर केला जातो. जर कुत्र्याला जवळून कुणी पाहिलं तर तो घाबरून जाईल. कारण तो अगदी चित्ता आहे असंच वाटतं. हा टायटस कुत्रा त्याच्या वेगळ्या लुकमुळे बिबट्यासारख्या कुत्र्याने लक्ष वेधून घेतलं आहे.
एका रिपोर्टनुसार या कुत्र्याचं नाव टायटस डॉग आणि तो शिकारी नाही. हा जगातल्या सर्वात वेगळा पिटबुल डॉग आहे आणि असं म्हटलं जातं ही पृथ्वीवर हा एकच असा डॉग आहे. इतर कुत्र्यांपेक्षा या कुत्र्याची प्रजाती फार वेगळी आहे. तो बिबट्यासारखा दिसतो त्याचं दिसणं अवर्णनीय आहे असं एक्सपर्ट सांगतात. कुत्र्यामध्ये झालेल्या म्युटेशनला नैसर्गिक मानलं जातं. काही लोकांचं म्हणणं आहे की पिटबुल डॉग आहे पण त्याचा फोटो फोटोशॉप केला आहे असं सांगण्यात येतं आहे.
तर काही लोक असं सांगत आहेत की कुत्रा एका ग्रुमर सलूनमध्ये बसला आहे. इतकंच नाही फोटो बघून लोक अंदाज लावत आहेत की टायटस डॉगवर शाईन पेंट करण्यात आलं आहे. काही लोक असंही म्हणत आहेत हा टायटस डॉगच आहे पण ही प्रजाती आता शिल्लक नाही. हे काहीही असलं तरीही या चित्त्यासारख्या दिसणाऱ्या कुत्र्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.