रश्मी ठाकरे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात, देवीच्या आरतीसोबतच जोरदार शक्तीप्रदर्शन
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या आज एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात होत्या. ठाण्यातल्या टेंभीनाका भागात असलेल्या देवीचं दर्शन रश्मी ठाकरेंनी घेतलं. त्याचप्रमाणे पूजाअर्चा आणि आरतीही केली. शिवसेनेतल्या उभ्या फुटीनंतर रश्मी ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. ठाण्यात आल्यानंतर रश्मी ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं. मुख्यमंत्री […]
ADVERTISEMENT

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या आज एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात होत्या. ठाण्यातल्या टेंभीनाका भागात असलेल्या देवीचं दर्शन रश्मी ठाकरेंनी घेतलं. त्याचप्रमाणे पूजाअर्चा आणि आरतीही केली.
शिवसेनेतल्या उभ्या फुटीनंतर रश्मी ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. ठाण्यात आल्यानंतर रश्मी ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्यानंतर ठाण्यातलं शिवसेनेचं अस्तित्व संपुष्टात आल्याचं बोललं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा दौरा ठरला.
शिवसेनेतल्या बंडानंतर राज ठाकरेंच्या निशाण्यावर रश्मी ठाकरे?, काय म्हणाले राज?
रश्मी ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन
रश्मी ठाकरे या ठाण्यात येताच हजारो शिवसैनिक आणि महिला नेत्या एकवटल्या होत्या. टेंभी नाक्यावर देवीचं दर्शन घेतल्यानंतर रश्मी ठाकरे या आनंद आश्रम या ठिकाणीही गेल्या होत्या. तिथे जाऊन रश्मी ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेचंही दर्शन घेतलं. शिवसेनेतल्या बंडखोरीमुळे आणि राज्यातील सत्ताबदलाचं केंद्र ठरल्यामुळे ठाण्याची चर्चा तीन महिन्यात चांगलीच झाली.