Rave Party : काहीजणांच्या बॅगेत सापडले ड्रग्ज; ‘कॉर्डेलिया’च्या अध्यक्षांनी दिली माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समुद्रमार्गे गोव्याला निघालेल्या क्रूझ जहाजावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा एनसीबीने शनिवारी पर्दाफाश केला. या कारवाईत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास एनसीबीकडून सुरू असतानाच कॉर्डेलिया क्रूझच्या अध्यक्षांनी झालेल्या प्रकाराबद्दल खुलासा केला आहे.

ADVERTISEMENT

कॉर्डेलिया क्रूझचं जहाज मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जात होतं. मुंबईची समुद्री हद्द ओलांडल्यानंतर जहाजात रेव्ह पार्टी सुरू झाली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत रेव्ह पार्टी उधळून लावली. या प्रकरणात दोन तरुणींसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

रेव्ह पार्टीत कोण कोण सहभागी होतं आणि कुणी आयोजित केली होती? याबद्दलची चर्चा सुरू असतानाच आता कॉर्डेलिया क्रूझचे अध्यक्ष आणि सीईओ जुर्गन बैलोम यांनी सविस्तर माहिती दिली.

हे वाचलं का?

‘अंमली पदार्थ विरोधी विभागाला काही प्रवाशांच्या सामनात ड्रग्ज सापडले. ज्या प्रवाशांच्या सामनात अंमली पदार्थ आढळून आले, त्यांना तत्काळ कॉर्डेलिया क्रूझवरून उतरवण्यात आलं. त्यामुळे क्रूझला विलंब झाला’, असं जुर्गन बैलोम यांनी म्हटलं आहे.

‘या सर्व प्रकारामुळे झालेल्या विलंबामुळे कॉर्डेलियाने प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांची दिलगिरी व्यक्त केली आहे. कारण यामुळे आलेल्या प्रवाशांना सर्व प्रकारच्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली. यात करमणूक कार्यक्रम, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, गरबा नृत्य आणि जहाजावरील इतर कार्यक्रमासह सुविधांचा उपभोग घेण्यास विलंब झाला’, असं बैलोम यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

एनसीबीने काय म्हटलंय?

ADVERTISEMENT

रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर एनसीबीने माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकली. हे जहाज २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जात होतं.

मिळालेल्या माहितीप्रमाणे जहाजावरील सर्व संशयितांची तपासणी करण्यात आली. या झाडाझडतीत एमडीएमए, कोकेन, एमडी आणि चरस यासारखे विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणात एकूण ८ जणांना अटक करण्यात आली असून, यात दोन महिलांचा समावेश आहे. त्याच्या सहभागाबद्दल तपास केला जात आहे’, असं एनसीबीने म्हटलं आहे.

शाहरुख खानच्या मुलाची चौकशी

एनसीबीने उधळलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची चौकशी केली जात असून, त्याच्या विरुद्ध अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, असंही एनसीबीने म्हटलंय आहे. आर्यन खानला पार्टीसाठी निमंत्रण करण्यात आलेलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT