Navneet Rana: ‘हे तर बिनकामाचे पगारी मुख्यमंत्री’, नवनीत राणा आक्रमक; थेट CM ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई: ‘उद्धव ठाकरे हे बिनकामाचे पगारी मुख्यमंत्री आहेत’, अशी टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. ‘मातोश्री’बाहेर जाऊन आपण हनुमान चालीसा पठण करणारच या आपल्या भूमिकेवर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे ठाम आहेत. त्यासाठी ते आज सकाळी मुंबईतही दाखल झाले आहेत. एकीकडे राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्याने शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणात […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘उद्धव ठाकरे हे बिनकामाचे पगारी मुख्यमंत्री आहेत’, अशी टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. ‘मातोश्री’बाहेर जाऊन आपण हनुमान चालीसा पठण करणारच या आपल्या भूमिकेवर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे ठाम आहेत. त्यासाठी ते आज सकाळी मुंबईतही दाखल झाले आहेत.
एकीकडे राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्याने शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणात मातोश्रीबाहेर जमा झाले असून ते राणा दाम्पत्याविरोधात दुपारपासून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. याचवेळी राणा दाम्पत्याने देखील पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पाहा नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर नेमकी काय टीका केली:
‘माझ्या महाराष्ट्राला जो शनी आणि साडेसाती लागली आहे.. एक व्यक्ती तो महाराष्ट्राचं नेतृत्व करतो.. मुख्यमंत्री आहेत.. प्रथम नागरिक आहेत आपल्या महाराष्ट्राचे. जर असं वाटत असेल की, ते जर दोन ते अडीच वर्ष ऑफिसमध्येच जात नसतील.. समजा, एखादा साधा व्यक्ती दोन वर्ष आपल्या ऑफिसमध्ये गेला नाही तर मला वाटतं की, कोणी त्याला पगारही देत नाही. हे तर बिनकाम पगारी आमचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रात.’









