Rajat Patidar : आरसीबीला मोठा धक्का, स्टार खेळाडू IPLमधून बाहेर

मुंबई तक

ADVERTISEMENT

rcb player rajat patidar ruled out from ipl 2023
rcb player rajat patidar ruled out from ipl 2023
social share
google news

Rajat Patidar ruled out from ipl 2023 : आयपीएलच्या स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल विरूद्ध गुजरात टायटन्समध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यापुर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. RCB चा स्टार खेळाडू IPLमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे विराट कोहलीला (virat Kohli) मोठा धक्का बसला आहे. या खेळाडूने आरसीबीसाठी गेल्या हंगामात खुप चांगली कामगिरी केली होती. मात्र या हंगामात तो बाहेर झाल्याने आरसीबीला मोठा झटका बसला आहे. (rcb player rajat patidar ruled out from ipl 2023 due to heel injury)

ADVERTISEMENT

आयपीएलला दुखापतीचे ग्रहण लागले आहे.एकामागून एक खेळाडू जखमी होत चालले आहेत. नुकताच गुजरात टायटन्सचा स्टार खेळाडू आणि न्युझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता फॅफ ड्युप्लेसीसचा संघ आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा रजत पाटीदार (rajat patidar) आयपीएलमधून बाहेर झाला आहे. टाचांच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे.

आरसीबीच्या ट्विटमध्ये काय?

आरसीबीने ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत रजत पाटीदारच्या (rajat patidar) दुखापतीची माहिती दिली आहे. रजत पाटीदार आयपीएलमधून बाहेर झाला आहे. टाचांच्या दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. रजत लवकर बरा व्हावा अशी आम्ही प्रार्थना करतो असे ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच कोच आणि मॅनेजमेंटने अद्याप तरी रजत पाटीदारच्या बदली खेळाडूबाबत निर्णय़ घेतला नाही आहे.

हे वाचलं का?

असा रंगला पहिला सामना

आरसीबीने आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 172 धावांचे आव्हान आरसीबीला दिले होते. आरसीबीने हे आव्हान 16.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून सहज पु्र्ण केले होते. या सामन्यात कोहलीने 49 बॉलमध्ये 82 धावांची खेळी केली होती. तर कर्णधार फॅफ डुप्लेसीसने 43 बॉलमध्ये 73 धावा केल्या हो्त्या. आरसीबीची आयपीएलमधली ही सुरूवात पाहता संघ फॉर्मात असल्याचे दिसून आले आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान आता आरसीबीचा दुसरा सामना 6 एप्रिलला कोलकत्ता नाईट राईडर्स विरूद्ध असणार आहे. आतापर्यंत कोलकत्ताने आपला पहिला सामना गमावला होता, त्यामुळे कोलकत्ता आयपीएलमधला पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे, तर आरसीबी आपली विजयी घौड़दौड कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. आता या सामन्यात आरसीबी बाजी मारते की कोलकत्ता याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT