Reliance Jio च्या ग्राहकांनाही झटका! अनलिमिटेड प्रीपेड प्लान महागले

मुंबई तक

एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडिया (Vodafone Idea) अर्थात वी (Vi) या दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड प्लान्सच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रिलायन्स जिओनेही प्रीपेड दरात वाढ केली आहे. त्यामुळे जिओच्या प्रीपेड ग्राहकांनाही महागाईचा झटका बसणार आहे. 1 डिसेंबरपासून नवे दर लागू केले जाणार आहेत. कोरोना आणि लॉकडाउनमुळे दूरसंचार सेवा क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. यातून सावरण्यासाठी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडिया (Vodafone Idea) अर्थात वी (Vi) या दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड प्लान्सच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रिलायन्स जिओनेही प्रीपेड दरात वाढ केली आहे. त्यामुळे जिओच्या प्रीपेड ग्राहकांनाही महागाईचा झटका बसणार आहे. 1 डिसेंबरपासून नवे दर लागू केले जाणार आहेत.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे दूरसंचार सेवा क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. यातून सावरण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी टॅरिफमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारती एअरटेलने अर्थात एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लानच्या दरात सुरुवातीला वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वोडाफोन-आयडियानेही प्रीपेड प्लान्सचे दर वाढवले असून, या दोन कंपन्यांपाठोपाठ रिलायन्स जिओनंही प्रीपेड प्लान्समध्ये वाढ केली आहे.

रिलायन्स जिओने आपल्या अनलिमिटेड प्रीपेड प्लान्सचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना सर्वच अनलिमिटेड प्लानसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 75 रुपयांच्या जिओ फोन प्लानची किंमत आता 91 रुपये इतकी करण्यात आली आहे.

अनलिमिटेड प्लान्सच्या किंमतीतही मोठी वाढ करण्यात आली आहे. 129 रुपयांच्या अनलिमिटेड प्लानची किंमत 155 रुपये झाली आहे. तर 149 रुपयांचा प्लान 179 रुपयांपर्यंत महागला आहे. 199 रुपयांचा प्लान 239 रुपयांना झाला असून, 249 रुपयांच्या प्लानसाठी आता 299 रुपये मोजावे लागणार आहेत.

वोडाफोन-आयडियाचे दर किती महागले?

वोडाफोन-आयडियाचे नवीन दर 26 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. कंपनीने केलेल्या घोषणेप्रमाणे, बेसिक प्रीपेड टॅरिफ प्लानच्या किंमतीत 20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 28 दिवसांची वैधता असलेल्या या बेसिक प्लानची किंमत पूर्वी 79 रुपये इतकी होती. नवीन किंमत 99 रुपये असणार आहे. या प्लाननुसार 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200 MB डेटा ग्राहकांना मिळेल.

149 रुपयांच्या प्लानची किंमती 179 रुपये झाली आहे. 449 रुपयांच्या प्लानची किंमत वाढून 539 रुपये, तर 699 रुपयांच्या प्रीपेड प्लानसाठी 839 रुपये मोजावे लागणार आहेत. यासोबतच डेटा टॉप अॅप्समध्येही वाढ करण्यात आली आहे. 84 दिवसांची वैधता असलेल्या डेटा प्लानसाठी पूर्वी 599 रुपये दर आकारण्यात येत होते. आता त्याची किंमत 719 रुपये इतकी झाली आहे.

जिओ आणि वोडाफोन आयडियाच्या काही प्लानच्या किंमती समान वाढल्या आहेत. 149 रुपयांच्या प्लानची किंमत 179 रुपये झाली आहे. तर 249 रुपयांचा दोन्ही कंपन्यांचा प्लान 299 रुपये झाला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp