SSR Death Anniversary: रियाला पुन्हा सुशांतची आठवण, रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

SSR Death Anniversary: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सोशल मीडियावर लोक सुशांतला आदरांजली वाहात आहेत. अशात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने इंस्टाग्राम पोस्ट करत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुशांतसोबतचे काही न पाहिलेले फोटो रियाने शेअर केले आहेत.

रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूत सोबतच्या आठवणी जागवत हे फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर ती म्हणते की असा एकही दिवस जात नाही की मला तुझी आठवण येत नाही…. यानंतर रियाने या फोटोंवर काही हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. रिया चक्रवर्तीची ही पोस्ट इंस्टाग्रामवर चांगलीच व्हायरल झाली आहे. या फोटोंमध्ये सुशांत आणि रिया एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसून येत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पहिल्या फोटोत सुशांतच्या मागे बसलेली रिया क्यूट पोज देते आहे.. तर सुशांतच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य मन मोहून टाकणारं आहे. दुसऱ्या फोटोत सुशांतने आपल्या कानामागे एक फूल लावलं आहे आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे तो फोटोची पोज देतो आहे. त्याच्या जवळ बसलेली रिया त्याची ही धमाल निरखून पाहते आहे. दोघंही मोकळ्या मैदानात एंजॉय करत आहेत हेच दिसतं आहे.

सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या?, 2 वर्षानंतर सीबीआयचा तपास कुठंपर्यंत पोहोचलाय?

ADVERTISEMENT

तिसऱ्या फोटोत सुशांतच्या गालावर रिया किस करताना दिसते आहे. हा एक सेल्फी आहे. दोघांचं उत्तम बॉडिंग या फोटोत दिसून येतं आहे. त्यानंतर चौथ्या म्हणजेच शेवटच्या फोटोत सुशांतने रियाला उचलून आपल्या मिठीत घेतलं आहे. रिया इंद्रधनुष्याजवळ बोट दाखवते आहे. या फोटोतही दोघांची केमिस्ट्री उत्तम आहे हेच दिसतं आहे.

ADVERTISEMENT

रियाने केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. लोक हे फोटो पाहून भावूक झाले आहेत. या फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक लोक सुशांतला आदरांजली वाहात आहेत.

Sushant Singh: सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीसच खरे ठरले?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज (१४ जून) दुसरी पुण्यतिथी आहे. २०२० मध्ये आजच्याच दिवशी सुशांतचा मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळून आला होता. गळफास लागलेल्या अवस्थेत सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह सापडला होता.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून बरंच राजकारण झालं. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केली गेली. तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे गेला. पुढे या प्रकरणात एनसीबी (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग), ईडी आली. मात्र, अद्याप सुशांतच्या मृत्यूचं गूढ कायम आहे.

१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रेतील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दुसऱ्या दिवशी त्याच्या मृतदेहावर विलेपार्लेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT