नागपूर : भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफा दुकान लुटलं, घटना CCTV मध्ये कैद
नागपूरच्या जरीपटका भागात असलेल्या अवनी ज्वेलर्सवर दोन चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. बंदुकीच्या धाकावर या दोन्ही चोरट्यांनी दुकानातला २० ते २५ लाखांचा मुद्देमाल चोरू नेला आहे. भरदिवसा नागपूर शहरात ही घटना घडल्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. सराफा व्यवसायिक आशिष नावरे यांचं जरीपटका भागात अवनी ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. दुकानात शिरल्यानंतर त्यांनी नावरे यांच्याकडे चेन […]
ADVERTISEMENT

नागपूरच्या जरीपटका भागात असलेल्या अवनी ज्वेलर्सवर दोन चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. बंदुकीच्या धाकावर या दोन्ही चोरट्यांनी दुकानातला २० ते २५ लाखांचा मुद्देमाल चोरू नेला आहे. भरदिवसा नागपूर शहरात ही घटना घडल्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
सराफा व्यवसायिक आशिष नावरे यांचं जरीपटका भागात अवनी ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. दुकानात शिरल्यानंतर त्यांनी नावरे यांच्याकडे चेन दाखवण्याची विनंती केली. यावेळी एका आरोपीने दुकानाचं शटर आतून बंद करत बंदुकीच्या धाकावर नावरे यांना खाली बसवलं आणि त्यांचे हात-पाय बांधले.
यानंतर दोन्ही चोरट्यांनी मुद्देमाल घेत घटनास्थळावरुन पोबारा केला. दुकानाजवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे दोन्ही चोरटे कैद झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
नागपूर : प्रेयसीचं अपहरण करुन व्हिडीओ व्हायरल, Tik Tok स्टार आणि त्याच्या साथीदाराला अटक