किरीट सोमय्या कोण आहेत?; रोहित पवारांनी आयकर धाडीसंदर्भातील आरोपांना दिलं प्रत्युत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कुंवरचंद मंडले

ADVERTISEMENT

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. विशेषतः राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करत सोमय्यांनी शरद पवार यांनाच आव्हान दिलं आहे. सोमय्यांनी केलेल्या आरोपांना आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं.

नांदेड दौऱ्यावर असताना आमदार रोहित पवार यांनी ‘मुंबई तक’शी संवाद साधला. यावेळी त्यांना किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. सोमय्यांनी केलेल्या आरोपांना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

हे वाचलं का?

किरीट सोमय्या केंद्रीय यंत्रणांचे दलाल, नाव न घेता प्रताप सरनाईकांचा आरोप

रोहित पवार म्हणाले, ‘मी आधीही बोललो आहे की, त्यांना ईडी, सीबीआय, आयटीकडून खास बातमी मिळते. विशेष म्हणजे ती बातमी देऊन त्यावर बोलायला सांगितलं जातं. कारण ईडी आणि संबंधित यंत्रणांच्या लोकांना ती बातमी देता येत नाही. त्यांना या धाडीतून काही सापडलेलं नाही. महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ईडी, सीबीआयचे प्रवक्ते किरीट सोमय्या बोलत आहेत’, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

ADVERTISEMENT

‘किरीट सोमय्या जितकं बोलतील, तितकं तथ्य लोकांना कळेल, असं मला वाटतं. उद्या कुणीही आव्हान देईल. आव्हान देणाऱ्या व्यक्तीला फक्त प्रसिद्धी हवी आहे. अशा व्यक्तीशी चर्चा करणं कितपत योग्य आहे? किरीट सोमय्यांनी आव्हान देण्याचं काय कारण?’, असा सवाल रोहित पवार यांनी सोमय्यांना केला.

ADVERTISEMENT

‘जरंडेश्वरची मालकी कुणाची हे अजित पवारांनी सांगावं’ आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोमय्या आक्रमक

‘ईडी, आयटीकडे माहिती असेल, तर त्याला आम्ही उत्तरं देऊ ना. हे कोण? हे प्रवक्ते असतील आयटी आणि भाजपचे, त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी आमची नाही. संबंधित यंत्रणेला काही साडलं असेल, यंत्रणेनं विचारलं तर आम्ही त्याला उत्तर देऊ’, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT