पंडित नेहरूंच्या निमंत्रणानंतर संघ स्वयंसेवकांनी 26 जानेवारीला राजपथावर केलं होतं संचलन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

26 जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशाच्या दृष्टीने या गणतंत्र दिवसाचं महत्त्व अनन्य साधारण आहे. राजपथावर संचलन साजरं होतं. आपल्या देशातील विविध राज्यांचे चित्ररथ निघतात. त्यात त्यांची संस्कृती दाखवली जाते. तसंच लष्कर, नौदल आणि वायूदल यांचीही शक्ती देशाला पाहण्यास मिळते. हा क्षण दरवर्षी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असतो. अशीच एक आठवण असते ती म्हणजे प्रजासत्ताक दिनी होणारं संचलन. विविध प्रकारच्या परेड यावेळी राजपथावर होतात.

ADVERTISEMENT

संचलन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही एकदा राजपथावर दिसले होते. ही गोष्ट तुम्हाला माहित आहे का? पंडित नेहरूंनी या सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं. तो दिवस होता 26 जानेवारी 1963 चा गणतंत्र दिवस. 1962 चं चीनसोबतचं युद्ध पार पडलं होतं. या युद्धामुळे भारत आणि चीन यांच्यात तणाव कायम होता.

1930 पासून देशात Muslim समाजाची लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे, RSS प्रमुख मोहन भागवत यांचं वक्तव्य

हे वाचलं का?

त्यावेळी जो गणतंत्र दिवस आला, त्यादिवशी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1963 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 26 जानेवारीचं औचित्य साधून राजपथावर संचलन करण्यासाठी बोलावलं होतं. पंडित नेहरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक कार्यामुळे प्रभावित झाले होते आणि संचलनात सहभागी होण्यासाठी संघ स्वयंसेवकांना बोलावलं होतं. त्यामुळे तो असा प्रजासत्ताक दिन होता ज्या दिवशी संघाचे स्वयंसेवक हे राजपथावर संचलन करताना दिसले होते. चीन आणि भारत यांच्यात झालेल्या युद्धादरम्यान जे सामाजिक कार्य संघाने करून दाखवलं त्याचा प्रभाव पंडित नेहरूंवर पडला होता. इतिहासकार रुद्रांगशू मुखर्जी यांच्या ‘Nehru & Bose Parallel Lives’ या पुस्तकात या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

एवढंच काय इतिहासकार रूद्रांगशू मुखर्जी यांनी हे देखील म्हटलं आहे की त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 26 जानेवारीच्या संचलनासाठी बोलावल्यानंतर दिल्ली काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते संचलनात सहभागी का झाले नाहीत असाही प्रश्न नेहरूंनी विचारला. तेव्हा त्यांना उत्तर देण्यात आलं की आमच्या फक्त 250 गणवेश आहेत. मात्र संघाची स्थिती तशी नाही. त्यांच्याकडे शेकडो गणवेश आहेत. त्यांच्यापुढे आम्ही संचलनासाठी उतरलो तर शोभा व्हायला नको असं उत्तर काँग्रेस सेवा दलाने दिलं आहे.

ADVERTISEMENT

पंडित नेहरू यांनी जेव्हा निर्णय घेतला की संघ स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी बोलावयचं आहे तेव्हा पक्षातल्या अनेकांनी का? हा प्रश्न विचारलाच. त्यावर नेहरूंनी उत्तर दिलं की मी फक्त संघ स्वयंसेवकांनाच नाही तर देशाचे नागरिक असलेल्यांनाही संचलनासाठी निमंत्रण दिलं होतं. संघ स्वयंसेवक हे आपल्याच देशाचे नागरिक आहेत त्यामुळे त्यांनी यामध्ये भाग घेतला.

1975 ला जेव्हा आणीबाणी लागली होती तेव्हा इंदिरा गांधी यांनी संघ विचार मोडून काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. त्यानंतर पुढे काँग्रेसने कायमच संघ विचारांच्या लोकांना फॅसिस्ट विचारांचे कार्यकर्ते असं संबोधलं आहे. मात्र इतिहासाची पानं उलगडून पाहिली तर इतिहासकार रूद्रांगशू मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार RSS च्या स्वयंसेवकांनीही राजपथावर संचलन केलं होतं आणि तेही दस्तुरखुद्द पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या निमंत्रणावरून.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT