पुणे : RTI Activist रविंद्र बऱ्हाटेला पोलिसांनी केली अटक, १८ महिन्यांपासून सुरु होता तपास

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जमीनीच्या व्यवहारात अनेकांना गंडा घालून दीड वर्षापासून फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बर्‍हाटेला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. अनेक दिवसापासून बर्‍हाटे पोलिसांच्या हातावरुन तुरी देऊन पसार होता. काही दिवसा आधी त्याच्या पत्नी संगिता रविंद्र बर्हाटे व मुलगा मयूर रविंद्र बर्‍हाटे याच्यासह चौघांना अटक झाली आहे.आता पर्यन्त एकूण 33 आरोपींना अटक करण्यात आले आहे

संबंधीत गुन्ह्यात कथीत पत्रकार देवेंद्र जैन, रविंद्र बर्हाटे याच्यासह 13 अरोपींवर 2 मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. रविंद्र बऱ्हाटेशी संपर्कात राहून कटात सहभागी झाल्याच्या कारणातून चौघांना अटक करण्यात आली होती. रविंद्र बऱ्हाटे च्या अटके बद्दल समजल्या नंतर प्रतिक्रिया देतांना भाजपा चे माजी आमदार योगेश टिळेकर म्हणाले की, भगवान के घर मी देर है अंधेर नही. टिळेकरांच्या मते रविंद्र बऱ्हाटे नी त्यांच्या वर खोटे आरोप लावून २०१८ साली बदनाम केले होते . जे खोटे आरोप लावले होते त्यातुन तपास संपूर्ण झाल्यावर मी निर्दोष मुक्त झालो असे टिळेकर म्हणाले. ह्या प्रकरणात योग्य तपास झाला तर रविंद्र बऱ्हाटे चा खरा चेहेरा समाजा पुढे येईल असा विश्वास टिळेकर यांनी बोलून दाखवला.

रवींद्र बऱ्हाटे हा टोळीप्रमुख असून त्याच्यासह एकूण ३३ हुन अधिक लोकांवर १७ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यापैकी हडपसर, आणि चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बऱ्हाटे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली आहे . रवींद्र बऱ्हाटे हा कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून दीड वर्षापासून फरारी होता. बऱ्हाटे याच्याशी त्याची पत्नी संगीता या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्यांना मंगळवारी दुपारी ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी रवींद्र बर्हाटे याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे २ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT