रशिया-युक्रेन युद्ध थांबणार?; शांती वार्ता बेलारुमध्येच होणार, बैठकीकडे जगाच्या नजरा
विशेष लष्करी मोहिमेच्या नावाखाली रशियाकडून युक्रेनवर करण्यात आलेल्या आक्रमणाचा आज पाचवा दिवस असून, या लष्करी संघर्षात एक सकारात्मक घटना घडली आहे. रशिया आणि युक्रेन चर्चा करण्यास तयार झाले असून, बेलारुसमध्येच ही चर्चा होणार आहे. बेलारुसच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. दोन्ही देशांतील बैठकीत काय तोडगा निघणार, याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. कीव्हच्या ताबा घेण्यासाठी […]
ADVERTISEMENT

विशेष लष्करी मोहिमेच्या नावाखाली रशियाकडून युक्रेनवर करण्यात आलेल्या आक्रमणाचा आज पाचवा दिवस असून, या लष्करी संघर्षात एक सकारात्मक घटना घडली आहे. रशिया आणि युक्रेन चर्चा करण्यास तयार झाले असून, बेलारुसमध्येच ही चर्चा होणार आहे. बेलारुसच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. दोन्ही देशांतील बैठकीत काय तोडगा निघणार, याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत.
कीव्हच्या ताबा घेण्यासाठी रशियाकडून युक्रेनवर 24 फेब्रुवारी रोजी आक्रमण करण्यात आलं. रशियन लष्कराने तीन बाजूंनी चढाई करत मिसाईल डागल्या. त्याचबरोबर बॉम्ब हल्लेही केले. सलग पाचवा दिवसांपासून रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष सुरू असून, संघर्षाच्या तिसऱ्या दिवशी रशियाने चर्चेचा तयारी दर्शवली होती.
रशियाच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 352 युक्रेनी नागरिकांचा मृत्यू, जखमींची संख्या 1 हजारांपेक्षा जास्त
रशियाने बेलारुसमध्ये चर्चेसाठी युक्रेनच्या सरकारला आमंत्रित केलं होतं. मात्र, युक्रेनने बेलारुमध्ये चर्चेचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. अखेर युक्रेनने रशियाचा प्रस्ताव स्वीकारला असून, आज दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये शांती वार्ता होणार आहे. त्यामुळे उभय देशांतील लष्करी संघर्ष निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.