Ukraine-Russia war : युद्धाला तोंड फुटलं! युक्रेनवर लष्करी कारवाईची पुतिन यांची घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ukraine-Russia war युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष टीपेला पोहचला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला इशारा दिला आहे की शस्त्र खाली टाका अन्यथा आम्ही बघून घेऊ. एवढंच नाही तर युक्रेनच्या विरोधात सैन्यही त्यांनी उतरवलं आहे.

रशियाने युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी याची घोषणा केली असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त आहे. रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही, असा इशारा देखील रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. एएपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत.

रशिया-युक्रेन संघर्ष : “…तर ४४ मिलियन पुरूष, महिला अन् मुलाचं लक्ष्य युद्ध लढणंच असेल”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला इशारा देताना शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. युक्रेनवर रशिया करत असलेल्या कारवाई कोणत्याही देशाने हस्तक्षेप त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा पुतीन यांनी दिला. युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे वृत्त ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

युक्रेनमध्ये बुधवारी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रशियाचं सैन्य सीमारेषेजवळ येत असल्याने तसंच परिस्थिती आणखी चिघळत असल्याने बुधवारी (23 फेब्रुवारी) युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

ही आणीबाणी संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. केवळ रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोनेस्तक आणि लुहान्स्कच्या पूर्वेकडील प्रदेश वगळला आहे, याठिकाणी 2014 पासून आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. ही आणीबाणीची स्थिती 30 दिवसांपर्यंत लागू असणार असून यामध्ये देशभरात सुरक्षायंत्रणा अधिक कडक करत वाहन तपासणी तसंच इत्यादी गोष्टी वाढवण्यात येतील. तसंच परिषदेच्या या मागणीला लागू होण्यापूर्वू संसदेची मंजुरी आवश्यक आहे. सुरक्षा परिषदेचे सचिव ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी ही माहिती दिली.

ADVERTISEMENT

काय आहे युक्रेन आणि रशियामधला वाद?

1991 ला सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर युक्रेन हा स्वतंत्र देश झाला. युक्रेन हा युरोपमधला दुसरा मोठा देश ठरला आहे. या देशात मोठ्या प्रमाणावर सुपीक जमीन आहे. तसंच या देशातल्या उद्योग व्यवसायही भरभराटीला आलेला आहे. युक्रेनच्या पश्चिमी भागात आपल्या देशाबाबत जबरदस्त अभिमान आहे. तर युक्रेनमध्ये रशियन बोलणारे लोक अल्पसंख्याक गटात मोडतात. मात्र त्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

2014 मध्ये रशियाला झुकतं माप देणारे युक्रेनचे राष्ट्रपती व्हिक्टर यानुकोविच यांच्या विरोधात युक्रेन सरकारमध्ये बंडाळी माजली होती. रशियाने नेमकी हीच संधी साधली. त्यानंतर रशियाने क्रिमियावर कब्जाही केला होता. हा संघर्ष बराच काळ चालला. व्हिक्टर यांना जनआंदोलनांपुढे आणि संघर्षापुढे हार पत्करावी लागली. मात्र तोपर्यंत रशियाने क्रिमियाला तोपर्यंत आपल्या देशात विलिन करून घेतलं होतं. या घटनेनंतर युक्रेन पश्चिमी युरोपसह आपले संबंध चांगले कसे होतील याचे प्रयत्न करत आहे. मात्र रशिया याचा सातत्याने विरोध करतो आहे. त्यामुळेच युक्रेन रशिया आणि पश्चिम युरोपमधील देशांच्या संघर्षात अडकला आहे. आता हा संघर्ष इतका टीपेला गेला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT