Russia-Ukraine war : युक्रेनमधून येणारा भारतीय विद्यार्थी गोळीबारात जखमी
रशिया-युक्रेनच्या संघर्षात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक विद्यार्थी गोळीबारात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी या घटनेची माहिती दिली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर अनेक भारतीय अडकून पडले आहेत. युक्रेनमधील कीव्ह, खार्किव्ह, सुमी या शहरांसह इतरही संघर्षग्रस्त शहरात भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना परत […]
ADVERTISEMENT

रशिया-युक्रेनच्या संघर्षात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक विद्यार्थी गोळीबारात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर अनेक भारतीय अडकून पडले आहेत. युक्रेनमधील कीव्ह, खार्किव्ह, सुमी या शहरांसह इतरही संघर्षग्रस्त शहरात भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हाती घेण्यात आलं आहे. मात्र, कीव्ह, खार्किव्हमध्ये प्रचंड हल्ले सुरू असल्यानं शहराबाहेर पडणं अवघड झालं आहे. दोन दिवसांपूर्वी एका भारतीय विद्यार्थ्याला खार्किव्ह आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर आता कीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे.
रशियाच्या हल्ल्यांमुळे युरोपातील सर्वात मोठ्या अणु ऊर्जा प्रकल्पाला आग; युक्रेननं दिला इशारा
केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी या घटनेची माहिती दिली आहे. विद्यार्थी कीव्हमधून बाहेर पडत असतानाच ही घटना घडली. त्यामुळे त्याला उपचारासाठी पुन्हा कीव्हमध्ये परतावं लागलं. “मला आज अशी माहिती मिळाली आहे की, कीव्हमधून येत असणाऱ्या एका विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. त्यामुळे त्याला अर्ध्या रस्त्यातून परत घेऊन जाण्यात आलं आहे. आम्ही जास्तीत जास्त नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत,” व्ही.के. सिंग म्हणाले.