Mansukh Hiren कच्चा दुवा ठरेल हे वाटल्यानेच सचिन वाझेंनी केली हत्या, NIA सूत्रांची माहिती
मनसुख हिरेन हा कच्चा दुवा ठरेल असं वाटल्याने सचिन वाझेंनी त्याची हत्या केली अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. अँटेलिया प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू आहे. तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचाही तपास NIA कडूनच सुरू आहे. सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर मनसुखची हत्या केल्याचा आरोप आहे. अशात आता एनआयएच्या सूत्रांनी ही माहिती दिली […]
ADVERTISEMENT

मनसुख हिरेन हा कच्चा दुवा ठरेल असं वाटल्याने सचिन वाझेंनी त्याची हत्या केली अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. अँटेलिया प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू आहे. तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचाही तपास NIA कडूनच सुरू आहे. सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर मनसुखची हत्या केल्याचा आरोप आहे. अशात आता एनआयएच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मनसुख हिरेन हा अँटेलिया प्रकरणातला कच्चा दुवा ठरू शकतो असं सचिन वाझेंना वाटलं त्यामुळे वाझेंनी त्याची हत्या केली असं आत्तापर्यंतच्या तपासानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेला वाटतं आहे. या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली आहे.
टिप्सी बारची रेड, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे, जाणून घ्या काय आहे कनेक्शन?
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यंत धूर्तपणे सचिन वाझेंनी अँटेलियासमोर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्याचा कट आखला. मात्र एटीएएस आणि एनआयए या दोन्ही तपास यंत्रणांनी मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ चोरीला कशी गेली याचा शोध सुरू केला. या प्रकरणाचा तपास करत असताना मनसुख हिरेनच्या कार चोरीला गेल्याच्या तक्रारीवर या दोन्ही तपासयंत्रणांना संशय आला. कारण १७ तारखेला कार बंद पडली आणि १८ तारखेला चोरी गेली असं मनसुख हिरेन यांनी म्हटलं होतं. हीच कार अँटेलियाबाहेर सापडणं, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरचं सीसीटीव्ही फुटेज या सगळ्यामुळे मनसुख यांनी केलेल्या तक्रारीत काही तथ्य नसल्याचं तपासात समोर आलं.
सचिन वाझे ते परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का?









