तीन-चार खासदार असणाऱ्यांचा सल्ला कोण घेईल? Pawar-Modi भेटीवर सदाभाऊ खोतांचा खोचक टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत भेट झाली. तब्बल १९ महिन्यांनंतर झालेल्या या भेटीमुळे राज्यात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. परंतू शरद पवार – नरेंद्र मोदींच्या भेटीवर सदाभाऊ खोत यांनी खोचक टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

मंडपाला ठेपे सुद्धा जास्त असतात, ज्यांचे ३-४ खासदार आहेत त्यांचा सल्ला कोण घेईल? वेगवेगळ्या कामानिमीत्त प्रत्येक जण पंतप्रधानांची भेट घेत असतात. मात्र महाविकास आघडीतील विशेष म्हणजे राष्ट्रवादी मधील कार्यकर्त्यांना फुशारकी मारण्याची सवय आहे. मोदी पवार भेट झाली की लगेच मोदींनी घेतला पवार साहेबांचा सल्ला अशी बतावणी होते. ज्यांचे तीन-चार खासदार आहेत त्यांचा सल्ला चारशे खासदार असणारे मोदी कशाला घेतील? इथं मांडवाला ठेपे देखील जास्त असतात देशाचे सरकार स्थापन करण्याचे म्हणलं की तीन चार खासदारांनी काय होतंय असं म्हणत सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. ते पंढरपुरात बोलत होते.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातली भेट ही सहकारी बँकांसाठी आरबीआयचे नवीन नियम आणि सहकार खात्यासंबंधी होती. सदाभाऊ खोतांनी पंढरपुरात बोलत असताना या विषयावरुनही राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला. “बंद पडलेले सहकारी साखर कारखाने कमी किंमतीत घेण्यात मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. खरेदी विक्री झालेल्या काळातील राज्य शिखर बँक आणि त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. लवरकच अनेक राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेत्यांची नावे समोर येतील.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT