Saif Ali Khan Case : "सैफ हल्लेखोराला भिडला म्हणून जहांगीर...", करीना कपूरचा वांद्रे पोलिसांना जबाब
करीनाने आपल्या जबाबात असंही सांगितलं की, हल्लेखोराने घरातून काहीही चोरलं नाही, पण तो भयंकर आक्रमक होता. त्याने सैफला अनेकदा भोसकलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

करीनाने वांद्रे पोलिसांकडून नोंदवला जबाब

सैफ अली खानवरील हल्ल्यावेळी काय घडलं?

सैफने जहांगीरला कसं वाचवलं, करीनाने सांगितलं...
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सैफची पत्नी आणि अभिनेत्री अशलेल्या करीनाने आपला जबाब नोंदवला. वांद्रे पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला. करीनाने तिच्या जबाबात सांगितलं की, जेव्हा हल्ला झाला तेव्हा मुलांना आणि महिलांना 12 व्या मजल्यावर पाठवण्यात आलं. तेव्हा सैफने महिला आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सैफ हल्लेखोराला भिडला, त्यामुळे हल्लेखोर जहांगीरपर्यंत पोहोचू शकला नाही.
हे ही वाचा >> Anjali Damania : DCC बँक घोटाळ्यात उज्ज्वल निकमांच्या मुलाकडूनच मुंडेंची वकिली? दमानियांचा दावा काय?
करीनाने आपल्या जबाबात असंही सांगितलं की, हल्लेखोराने घरातून काहीही चोरलं नाही, पण तो भयंकर आक्रमक होता. त्याने सैफला अनेकदा भोसकलं. हल्ल्यानंतर मी घाबरलेली असल्यानं करिश्माने मला तिच्या घरी नेलं असं करीनाने सांगितलं आहे.
दरम्यान, 15 जानेवारीला बुधवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास अभिनेता सैफ अली खान याच्या घरात चोर घुसला. सैफच्या मुलांना सांभाळणाऱ्या बाईने चोराला घरात पाहिलं आणि तिने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. हाच आरडाओरडा ऐकून सैफ अली खान हा झोपेतून जागा झाला आणि त्याने आवाजाच्या दिशेने तात्काळ धाव घेतली. यावेळी आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने चोराशी झटापट केली. पण यावेळी चोरट्याने सैफवर थेट चाकूने हल्ला चढवला आणि एकामागून एक तब्बल सहा वार केले.