Sakinaka बलात्कार आणि खून प्रकरण-मुंबई पोलिसांनी 18 दिवसांत दाखल केलं आरोपपत्र
साकीनाका बलात्कार आणि खून प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 दिवसात आरोपपत्र दाखल केलं आहे. साकिनाका भागात ही धक्कादायक घटना घडली होती. 10 सप्टेंबरला ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात आता 346 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात 77 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. तसंच मेडिकल रिपोर्ट, फॉरेन्सिक अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे असं सगळं […]
ADVERTISEMENT
साकीनाका बलात्कार आणि खून प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 दिवसात आरोपपत्र दाखल केलं आहे. साकिनाका भागात ही धक्कादायक घटना घडली होती. 10 सप्टेंबरला ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात आता 346 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात 77 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. तसंच मेडिकल रिपोर्ट, फॉरेन्सिक अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे असं सगळं जोडण्यात आलं आहे. दिंडोशी कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
हे वाचलं का?
दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या बलात्काराच्या घटनेनं 10 सप्टेंबर मुंबई हादरली. मुंबईतील साकीनाका भागात एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. साकीनाका भागातील खैराणी रोडवर 32 वर्षीय महिलेवर आधी बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिच्यावर प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड टाकल्याचा क्रूर प्रकारही नराधमाने केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. तर आरोपी मोहित चौहानला बेड्या ठोकल्या. मात्र उपचारादरम्यान या पीडितेचा यामध्ये मृत्यू झाला.
घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर…
ADVERTISEMENT
साकीनाका बलात्कार प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. या फुटेजमध्ये आरोपींने महिलेवर बलात्कार करून क्रूर अत्याचार केल्याचं दिसत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. आरोपीनं बलात्कार केल्यानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अनेदा रॉड टाकण्याचा क्रूर आणि संतापजनक प्रकार केला हेदेखील यामुळे समोर आलं. महिला अत्यवस्थ झाल्यानंतर आरोपीनं पीडितेला टेम्पो टाकून दिलं आणि फरार झाला. हे सगळं सीसीटीव्हीत कैद झालं आहे असंही पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
sakinaka Rape case : त्याला सगळी सूट देऊया! काय?; अभिनेत्री हेमांगी कवीचा सवाल
हे प्रकरण मुंबईत घडल्यानंतर मुंबई पोलिसांची एक बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. या बैठकीत पोलिसांना अत्यंत महत्त्वाच्या सूचना कऱण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांनी काय सूचना केल्या ?
1) महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी.महिलांवर हल्ले होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवू शकतो अशी शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून याठिकाणी गस्त वाढवावी.
2) प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस रात्र वेळोवेळी भेटी द्याव्यात.
3) स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणीदेखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी.
4) महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे.
5) गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्याची कार्यवाही लगेच सुरु करावी.
आता या सगळ्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT