दसऱ्याच्या दिवशीच ज्वेलर्समधून एक कोटींचं सोनं घेऊन पळाला सेल्समन, पुण्यातली घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समीर शेख, प्रतिनिधी, पिंपरी

ADVERTISEMENT

दागिन्यांच्या दुकानातून अडीच किलो सोन्याचे दागिने चोरल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरातून उघडकीस आली आहे, या संदर्भात दागिन्यांच्या दुकानाच्या मालकाने आता दुकानातील काम करणाऱ्या फरार सेल्समन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ज्या संदर्भात पोलीस आता या फरार गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.

या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड परिसरातील महावीर नावाच्या दागिन्यांच्या दुकानातून ही घटना उघडकीस आली, ज्याबद्दल ही बातमी आता समोर आली आहे. या गुह्या विषयी अधिक माहिती देतांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले 30 वर्षीय मुकेश सोळंकी हा पिंपरी चिंचवडच्या चिखली परीसरात असलेल्या महावीर ज्वेलरी शॉपमध्ये सेल्समन म्हणून काम करायचा. संधीचा पुरेपूर फायदा घेत तो राणीहार, गंठण, नैकलेस यासारखे मौल्यवान सोन्याचे दागिने घेऊन पळून गेला.

हे वाचलं का?

मुकेश या दागिन्यांच्या दुकानात बराच काळ दिसत नसल्यामुळे, त्याचे मालक जितेंद्र जैन यांना संशय आला आणि त्यांनी मुकेश यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद असल्याने त्यांनी ताबडतोब दुकानातील सोन्याच्या सर्व दागिन्यांची मतमोजणी केली दरम्यान त्यांना या प्रसंगी अडीच किलों सोन्याचे वेगवेगळे दागिने दुकानात नसल्याचे कळाले या दागिन्यांची क़ीमत 1 कोटी 18 लाख 6 हजार 6 शे रुपये असल्याचे ची माहिती त्यांनी दिली आहे त्यानंतर या दागिन्यांच्या दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज यांनी तपासले तेव्हा त्यात मुकेशची सर्व गुन्हेगारी घटना स्पष्टपणे दिसली. या गुन्हेगारी घटनेची तक्रार नोंदवल्यानंतर, आता पोलिस फरार सेल्समन मुकेश सोळंकी याचा शोध घेत आहेत.

मुकेश अॅक्टिव्हा गाडीवरून पळून गेला आहे असंही कृष्णप्रकाश यांनी सांगितलं. तसंच या प्रकरणी आता त्याचा शोध घेतला जातो आहे असंही स्पष्ट केलं. MH 14 EZ 8075 असा या अॅक्टिव्हाचा नंबर आहे. मुकेश सोळंकीने जी चोरी केली ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. लवकरच आरोपीला अटक करू अशी अपेक्षा आहे असंही कृष्णप्रकाश म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

महावीर ज्वेलर्सचे मालक जितेंद्र याने सांगितलं की मुकेश सोळंकीने सोन्याचा गंठणचा बॉक्स आणि राणी हार असा जवळपास अडीच किलो सोनं घेऊन पळून गेला. माझं लक्ष नव्हतं त्यावेळी तो पळाला ही सगळी घटना आमच्या दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या सोन्याची किंमत 1 कोटी 18 लाख रूपये आहे. दसरा असल्याने गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन तो पळाला आहे असंही मालक जितेंद्र यांनी मुंबई तकला सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT