संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी, शाहू छत्रपतींचा दावा
संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही देवेंद्र फडणवीस यांची खेळी होती असा दावा शाहू छत्रपती यांनी पत्रकारांसोबत बोलताना केला आहे. राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या होणाऱ्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. माजी खासदार संभाजीराजे यांना निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार अशी भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी विधानसभेच्या सर्व सदस्यांना पत्र पाठवून मदत करण्याचं आवाहन केलं. मात्र कुठल्याच […]
ADVERTISEMENT

संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही देवेंद्र फडणवीस यांची खेळी होती असा दावा शाहू छत्रपती यांनी पत्रकारांसोबत बोलताना केला आहे. राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या होणाऱ्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. माजी खासदार संभाजीराजे यांना निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार अशी भूमिका घेतली.
त्यानंतर त्यांनी विधानसभेच्या सर्व सदस्यांना पत्र पाठवून मदत करण्याचं आवाहन केलं. मात्र कुठल्याच पक्षाने ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेतली. आता त्यानंतर त्यांनी अपक्ष लढावं ही फडणवीस यांचीच खेळी होती असं छत्रपती शाहूंनी म्हटलं आहे.
काय म्हणाले शाहू महाराज?
छत्रपती घराण्याचा या सगळ्यात अपमान वगैरे झाला असा काही प्रश्न येत नाही हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत काही विषय आला असता तर गोष्ट वेगळी होती. मात्र तसं काही झालं नाही. संभाजीराजेंना उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली. संभाजीराजेंना माघार घ्यावी लागणं हा छत्रपतींच्या घराण्याचा अपमान आहे अशी चर्चा रंगू लागली होती त्याला आज शाहू महाराजांनी हे उत्तर दिलं आहे.