रायगडावर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न संभाजीराजेंनी हाणून पाडला, पुरातत्त्व विभागाची कारवाई
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर रंगरंगोटी करून आणि चादर पसरवून धार्मिक प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न खासदार संभाजीराजेंनी हाणून पाडला. रायगडावर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केल्याची माहिती किल्ले प्रेमी आणि शिवप्रेमींनी छत्रपती संभाजीराजेंना दिली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी पुरातत्त्व विभागाला एक पत्र लिहिलं. तसंच असा प्रयत्न होतो आहे त्याबाबत योग्य कारवाई केली […]
ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर रंगरंगोटी करून आणि चादर पसरवून धार्मिक प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न खासदार संभाजीराजेंनी हाणून पाडला. रायगडावर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केल्याची माहिती किल्ले प्रेमी आणि शिवप्रेमींनी छत्रपती संभाजीराजेंना दिली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी पुरातत्त्व विभागाला एक पत्र लिहिलं. तसंच असा प्रयत्न होतो आहे त्याबाबत योग्य कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी केली.
यानंतर लगेचच पुरातत्त्व विभागाने कारवाई करून धार्मिक स्थळ उभारण्याचा प्रय़त्न हाणून पाडला. तसंच रायगडावरचं ते ठिकाण पूर्ववत केलं. या ठिकाणी आता सुरक्षा रक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत संभाजीराजेंनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
काय आहे संभाजीराजेंचं पत्र?
दुर्गराज रायगडावरील ‘मदार मोर्चा’ येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल पुरातत्व विभागास पत्र दिले….