नवाब मलिक यांनी केलेल्या खंडणी वसुलीच्या आरोपांना समीर वानखेडेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

दिव्येश सिंह

माझ्यावर नवाब मलिक यांनी केलेले सगळे आरोप खोटे आहे. होय मी मालदिवला गेलो होतो. त्यासाठी मी रितसर सुट्टी घेतली होती. आत्ताच्या घडीला माझ्यावर, माझ्या बहिणीवर, माझ्या वडिलांवर वाट्टेल ते आरोप केले जात आहेत. मी माननीय मंत्री महोदयांना हे सांगू इच्छितो की आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. असं उत्तर आता समीर वानखेडे यांनी नवाब मलिक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

माझ्यावर नवाब मलिक यांनी केलेले सगळे आरोप खोटे आहे. होय मी मालदिवला गेलो होतो. त्यासाठी मी रितसर सुट्टी घेतली होती. आत्ताच्या घडीला माझ्यावर, माझ्या बहिणीवर, माझ्या वडिलांवर वाट्टेल ते आरोप केले जात आहेत. मी माननीय मंत्री महोदयांना हे सांगू इच्छितो की आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. असं उत्तर आता समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांना दिलं आहे.

काय आरोप केले होते नवाब मलिक यांनी?

‘सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर समीर वानखेडे यांना NCB मध्ये आणण्यात आलं. त्यानंतर ते सातत्याने बॉलिवूडच्या मागे लागले आहेत. कोरोना काळात जेव्हा अख्खं बॉलिवूड मालदिवमध्ये होतं तेव्हाच समीर वानखेडेही तिथे होते. त्यांचे कुटुंबीय होते. समीर वानखेडे तिथे खंडणी वसुलीसाठी गेले होते. समीर वानखेडे हे दुबईला का गेले होते याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांनी आर्यन खान विरोधात उभी केलेली केस हा बनाव आहे. जाणीवपूर्वक बॉलिवूडला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं जातं आहे’ असे आरोप नवाब मलिक यांनी केले होते.

या आरोपांना आता समीर वानखेडे यांनी उत्तर दिले आहे. मुंबई तकचे प्रतिनिधी दिव्येश सिंह यांनी समीर वानखेडे यांना फोन केला आणि नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविषयी विचारलं. तेव्हा नवाब मलिक यांनी केलेले सगळे आरोप खोटे आहेत आणि आपण या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp