कायदेशीर अडचणीत अडकलेले समीर वानखेडे कोपरी पोलीस ठाण्यात दाखल, पोलिसांना म्हणाले…
एनसीबीचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे कायदेशीर अडचणींमध्ये अडकले आहेत. समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सद्गुरू बार आणि रेस्तराँचं लायसन्सचं हे प्रकरण आहे. समीर वानखेडे आज ठाण्यातल्या कोपरी पोलीस स्टेशनला पोहचले असून ते तिथे त्यांचा जबाब नोंदवणार आहेत. समीर वानखेडे यांच्या विरोधात कलम 420, 181, 188, 465, 468, 471 या कलमान्वये गुन्हा दाखल […]
ADVERTISEMENT

एनसीबीचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे कायदेशीर अडचणींमध्ये अडकले आहेत. समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सद्गुरू बार आणि रेस्तराँचं लायसन्सचं हे प्रकरण आहे. समीर वानखेडे आज ठाण्यातल्या कोपरी पोलीस स्टेशनला पोहचले असून ते तिथे त्यांचा जबाब नोंदवणार आहेत. समीर वानखेडे यांच्या विरोधात कलम 420, 181, 188, 465, 468, 471 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन प्रकरणांचा जबाब नोंदवण्यासाठी समीर वानखेडे ठाणे येथील कोपरी पोलीस ठाण्यात पोहचले आहेत.
समीर वानखेडेंना या प्रकरणात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. ज्यानुसार ते आता जबाब नोंदवण्यासाठी आले आहेत.
एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सद्गुरू बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द करण्याचे आदेश आले आहेत. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्काने समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वयाच्या 17 व्या वर्षी नावावर बारचा परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही नोटीस बजावली होती.
भारतीय रेव्हेन्यू सेवेत कार्यरत असलेले आणि एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे बार परवान्यामुळे अडचणीत आले आहेत. फसवणुकीसह वानखेडेंविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वानखेडेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र याचिकेबद्दल काही प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. यावेळी न्यायालयानंही खडेबोलही सुनावले.