उद्धव ठाकरेंनी पैसे घेऊन मंत्रीपद आणि पालकमंत्री पद दिलं?; संदिपान भुमरेंचा आरोपानं खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेतले आमदार फुटले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदार गुवाहाटीला गेले. त्यानंतर सत्ता स्थापन झाली आणि बंडखोर आमदारांना शिवसेनेकडून गद्दार संबोधलं गेलं. इतकंच नाही, तर ५० खोके घेतल्याचा आरोपही शिंदे गटातल्या आमदारांवर सातत्यानं होतोय. आता याच ५० खोके, एकदम ओके वरून कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरेंनी थेट उद्धव ठाकरेंवर पैसे घेतल्याचा आरोप केलाय.

ADVERTISEMENT

शिंदे गटातल्या बंडखोर आमदारांवर सातत्यानं ५० खोके घेतल्याचा आरोप होतोय. आदित्य ठाकरेंही यावरून शिंदे गटाला लक्ष्य करताना दिसताहेत. पण, आता शिंदे गटानेच थेट उद्धव ठाकरेंवर पैसे घेतल्याचा आरोप केलाय. शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांनी शंकरराव गडाख यांचं नाव घेत हा आरोप केलाय.

संदिपान भुमरे उद्धव ठाकरेंवर टीका करताना काय म्हणाले?

औरंगाबादमध्ये शिंदे गटाचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना संदिपान भुमरेंनी आरोप केलाय. “हात जोडत यायचा आणि निघून जायचा. आपण बैठकीत काही बोललो की म्हणायचा मी चाललो निघून. तुमच्या (उद्धव ठाकरे) का बापाची सत्ता आहे ही? निवडून आम्ही यायचं आणि सत्ता तुम्ही (उद्धव ठाकरे) भोगायची. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता? अरे आम्ही खस्ता खाल्ल्या.”

हे वाचलं का?

प्रताप सरनाईक-एकनाथ शिंदे यांच्यात मतदारसंघांच्या मुद्द्यावरून वाद, खरं काय?

“यांनी (उद्धव ठाकरे) शंकरराव गडाखला, अपक्ष माणसाला जलसंधारण दिलं. अपक्ष माणसाला पालकमंत्री केलं. गडाखसोबत काय व्यवहार केला आम्हाला माहितीये. शंकरराव गडाखकडून किती खोके घेतले आम्हाला माहितीये”, असा दावा करताना संदिपान भुमरेंनी थेट उद्धव ठाकरेंनी पैसे घेतल्याचा आरोप केलाय.

एकनाथ शिंदे-रामदास कदम ‘५० खोके, एकदम ओके’वर काय म्हणाले?

यापूर्वी शिंदे गटातल्या नेत्यांनी शिंदेंवर आरोप केलेले आहेत. मात्र ते आरोप थेटपणे केलेले नव्हते. मात्र, संदिपान भुमरेंनी नाव घेऊनच ठाकरेंनी पैसे घेतल्याचा दावा केलाय. यापूर्वी रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना इशार दिला होता. “फक्त गद्दार, खोके-खोके म्हणायचं. पण त्याचं उत्तर माझ्याकडं आहे. मातोश्रीला खोके नवीन नाहीत. समझनेवाले को इशारा काफी है, त्यामुळे आपण कुणाला बोलतोय. काय बोलतोय. पन्नास आमदार का जातात याचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. खोक्यांचे धंदे आमचे नाहीत. ते तुमचे धंदे आहेत. खोके तुम्ही घेता, मिठाई तुम्ही खाता. म्हणून तुम्ही जेव्हा दुसऱ्याकडं एक बोट दाखवता, तेव्हा बाकीचे बोटं आपल्याकडं असतात याचं ध्यान ठेवा”, असं रामदास कदम बोलले होते.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते, “खोके कुठे जातात आणि कोण-कोठे गद्दारी करतोय? हेही मला माहीत आहे. माझ्याकडे सगळा हिशोब आहे. मला कामातून उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. त्यांनीही मला बोलायला भाग पाडू नये, एवढीच माझी इच्छा आहे”, असं म्हणत शिंदे म्हणाले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT