बुलढाणा : ‘तर’ शिवसैनिकाला दुसरी भाषा येत नाही; आमदार गायकवाडांकडून मारहाणीचे समर्थन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बुलढाणा : बुलढाण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आमने-सामने आले होते. ठाकरे गटाच्या एका सत्कार कार्यक्रमावर काही तरुणांनी अचानक हल्ला केला. यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी हा हल्ला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते आणि गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्याकडून करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे.

बुलढाणा : ठाकरे-शिंदे गटात तुफान राडा; आमदार पुत्रांकडून मारहाण झाल्याचा आरोप

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संजय गायकवाड काय म्हणाले?

या आरोपांवर बोलताना आणि आजच्या घडलेल्या घटनेचे समर्थन करता का? यावर उत्तर देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, कोणी काही बोलले आणि त्याला आमचे कार्यकर्ते उत्तर देत असतील तर आम्ही निषेध करणार नाही. कारण कोणीही आपली बाजू खरी सांगत नाही. शेगाव, मेहकर, चिखली अशा मेळाव्यांमध्ये ठाकरे गटाने काय भाषा वापरली होती ती तुम्ही ऐकली का? ते जर चांगले बोलले असते तर आमचे लोकं कशासाठी तिथे गेले असते?

ADVERTISEMENT

गायकवाड म्हणाले, आमचे आजही आवाहन आहे की तुम्ही तुमचा पक्ष चालवा, आम्ही आडवं येत नाही. तुमची विचारधारा काँग्रेस-सेनेची आहे. ती तुम्ही संभाळत बसा, फक्त जाहीर कार्यक्रमांमध्ये आमचे उल्लेख नको. पण सांगून समजत नसेल तर शिवसैनिकाला दुसरी भाषा येत नाही.

ADVERTISEMENT

आता ठाकरे गटाने तक्रार दिली तर आम्ही पण देणार. ते जेवढी नाव देतील तेवढीच नाव आम्ही पण देणार. कारण शेवटी कायदा सर्वांसाठी सारखाचं आहे. आमची लोकं काही भांडण करायला गेले नव्हती. ते जर अपशब्द बोलले तर समज द्यायाला गेले होते. पण तेच हातघाईवर आले, मग काय जंग मे सब जायज होता है, असेही समर्थन गायकवाड यांनी केले.

बुलढाणा : ठाकरे-शिंदे गटात तुफान राडा; आमदार पुत्रांकडून मारहाण झाल्याचा आरोप

2 ते 3 जणांना टार्गेट करुन मारले का? असा सवाल विचारा असता गायकवाड म्हणाले, बोलणारे जे आहेत तेच टार्गेट होत असतात. बाकी कोण बोललेच नसेल तर? त्यांच्या उपनेत्याला माझ्या मुलाने हात धरुन आत नेले. त्यांना धक्काही लागू दिला नाही. तुम्ही एवढ्या दिवसात आमच्या तोंडात कधी अपशब्द ऐकले का? आम्ही कधी ठाकरे परिवाराबद्दल कधी अपशब्द बोललो का? मग आम्ही नम्रतेने वागायंच आणि त्यांनी मोकाट काहीही बोलायचं हे किती दिवस चालणार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT