Shantabai Rathod : ‘संजय राठोडांची पूजा करा, आरती ओवाळा’; पूजा चव्हाणची आजी शिंदे सरकारवर संतापली
-रोहिदास हातांगळे, बीड ‘या सरकारकडून पूजा चव्हाणला न्याय मिळण्याची अपेक्षा होती, पण यानीही मंत्रिमंडळात स्थान दिलंय. ही लाजिरवाणी बाब आहे’, असं म्हणत पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी शिंदे सरकारवर संताप व्यक्त केला. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यानं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आधीच आक्षेप घेतला असून, त्यानंतर आता संजय राठोडांमुळे सरकार […]
ADVERTISEMENT

-रोहिदास हातांगळे, बीड
‘या सरकारकडून पूजा चव्हाणला न्याय मिळण्याची अपेक्षा होती, पण यानीही मंत्रिमंडळात स्थान दिलंय. ही लाजिरवाणी बाब आहे’, असं म्हणत पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी शिंदे सरकारवर संताप व्यक्त केला. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यानं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आधीच आक्षेप घेतला असून, त्यानंतर आता संजय राठोडांमुळे सरकार टीकेचं धनी ठरताना दिसत आहे.
तब्बल दीड महिन्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळात गेल्या सरकारमध्ये गंभीर आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या संजय राठोड यांचा समावेश करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा टीकेचे सूर उमटू लागले आहेत.
९ ऑगस्ट रोजी १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात संजय राठोड यांचाही समावेश आहे. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यावरून सरकारवर टीका होऊ लागली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावरून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता पूजा चव्हाणची आजी शांताबाई राठोड यांनी सरकारला सुनावलं आहे.










