Sanjay Raut बोलले अन् सत्ताधारी पेटले… विधानसभेत राडा, मीडियासमोर शिवीगाळ!
Sanjay Raut’s controversial statement and Controversy: मुंबई: शिवसेना (Shiv Sena UBT)पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच वादग्रस्त विधान करणं हे संजय राऊतांना चांगलंच भोवलं आहे. कारण याच मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) आमदारांनी राऊतांविरोधात हक्कभंग आणला […]
ADVERTISEMENT

Sanjay Raut’s controversial statement and Controversy: मुंबई: शिवसेना (Shiv Sena UBT)पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच वादग्रस्त विधान करणं हे संजय राऊतांना चांगलंच भोवलं आहे. कारण याच मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) आमदारांनी राऊतांविरोधात हक्कभंग आणला आहे. तसंच विधानसभा (Vidhan Sabha) आणि विधान परिषदेचंही (Vidhan Parishad) कामकाज बंद पाडलं. यावेळी सत्ताधारी आमदारांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदारांनी राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला पण सरकारला महागाईच्या मुद्द्यावर चर्चाच करायची नव्हती म्हणून राऊतांचा मुद्दा मोठा करण्यात आला असा आरोप करण्यात आला आहे. जाणून घ्या राऊतांच्या वक्तव्यावर कोणकोणत्या आमदारांनी काय प्रतिक्रिया दिली हे आपण सविस्तर पाहूयात. (sanjay raut controversial statement and the ruling party was on fire uproar in assembly abuse on the steps)
सगळ्यात आधी ज्यावरून वाद झाला ते संजय राऊत यांचं नेमकं काय वक्तव्य आहे ते आपण पाहूयात:
कोल्हापूर येथे बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करताना एक विधान केलं. त्यावरून वाद निर्माण झाला. “सरकार बदलताच या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. असे गेल्या सहा महिन्यात या सरकारने ईडब्ल्यूच्या माध्यमातून 28 चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला. जे विरोधात आहेत. त्यांना तुरुंगात टाकायचं. खोटे गुन्हे दाखल करायचे. बदनाम करायचं. लक्षात ठेवा. 2024 ला याचा हिशोब केला जाईल”, असं विधान संजय राऊतांनी केलं.
“ही जी बनावट सेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ… हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावर काढलं तरी आम्ही काय पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली आहेत. ती आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीये. पदं गेली पदं परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे”, असं विधान संजय राऊतांनी कोल्हापुरात केलं.
संजय राऊत यांच्या याच वक्तव्यावरून सत्ताधारी आमदारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. पाहा राऊतांबाबत नेमक्या त्यांच्या काय आहेत प्रतिक्रिया..
भरत गोगावलेंनी वापरले संजय राऊतांना अपशब्द
माध्यमांसमोर येताच शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले आणि काही आमदारांनी संजय राऊतांविरोधात घोषणाबाजी केली तसेच त्यांना शिव्याही दिल्या.. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना गोगावले पुढे म्हणाले की, ‘संजय राऊतने जे वक्तव्य केलं आहे ते सभागृहाला केलंय. ते अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे. आमची मागणी आहे की, त्याला तातडीने अटक करावी. त्याला जे शासन आहे ते करावं. जर आम्ही चोर असलो तर सभागृहात प्रश्न कोण मांडणार? म्हणून आम्हाला सिद्ध करायचं की, चोर आम्ही आहोत की संजय राऊत..’