Sanjay Raut: श्रीकांत शिंदेंवरील आरोप राऊतांना भोवणार? ठाण्यात गुन्हा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut's response to Ajit Pawar's criticism
Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut's response to Ajit Pawar's criticism
social share
google news

Sanjay raut । Shrikant Shinde। Thane police : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून खळबळ उडवून दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरो संजय राऊतांनी केला. याच प्रकरणात राऊतांविरुद्ध ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्याला मारण्याचा कट केला जात असल्याचा आरोप केला होता. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावरील हल्ल्याची सुपारी ठाण्यातील गुंडांना दिली असल्याचं राऊतांनी पत्रात म्हटलेलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक कार्यकर्ता असलेल्या राजा ठाकूर याला सुपारी दिली असल्याचा दावा राऊतांनी तक्रारीत केला होता.

संजय राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर शिंदे समर्थक आक्रमक झाले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांची नाहक बदनामी केल्याचा आरोप करत ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

Exclusive: ‘झिरवळांवरची अविश्वास नोटीस रद्द झाली असेल’, Rahul Narwekar यांचा मोठा दावा

खासदार संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत कापूरबावडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ADVERTISEMENT

संजय राऊतांविरुद्ध कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय?

संजय राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम 211, 153 (अ), 501, 504, 505 (2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केली, समाजात तेढ, वैमनस्य निर्माण करणे, खोटे पत्र देणं आदी बाबीप्रकरणी तक्रार करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

Shiv Sena: ‘ठाकरेंच्या आमदारांना व्हीप बजावता येणार नाही’, CM शिंदे काय म्हणाले?

संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं -मिनाक्षी शिंदे

संजय राऊतांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मिनाक्षी शिंदे म्हणाल्या, “संजय राऊत बेताल वक्तव्ये करीत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने काहीही बडबडत असतात. खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी आक्षेपार्ह विधानं करीत आहेत”, अशी टीका शिंदे यांनी केली.

ठाणे पोलिसांनी नोंदवला राऊतांचा जबाब

बुधवारी (22 फेब्रुवारी) सकाळी ठाणे पोलिसांनी इगतपुरी येथे जाऊन संजय राऊत यांनी दिलेल्या लेखी तक्रारी अर्जावर त्यांचा जबाब नोंदवला. दुसरीकडे बुधवारी रात्री मीनाक्षी शिंदे यांच्या आलेल्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्या विरोधातच गुन्हा दाखल केला आहे.

राजा ठाकूर यांच्या कुटुंबीयांनीही दिली तक्रार

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या पत्रात राजा ठाकूर यांचा उल्लेख केलेला होता. राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी मंगळवारी रात्री लेखी तक्रार कपूरबावडी पोलीस ठाण्यात दिली. त्यासोबत आमची बदनामी झाली असल्याचे सांगत न्यायालयात दावा देखील दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

Shiv Sena: सुप्रीम कोर्टाने शिंदेंचे बांधले हात! ठाकरेंच्या आमदारांना संरक्षण

संजय राऊतांना वेड लागलं आहे -नरेश म्हस्के

संजय राऊत यांना वेड लागला आहे. त्यांना रोज सकाळी बडबड करण्याची सवय, असं म्हणत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी टीका केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT