सातारा: राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही थिरकले!
सातारा: राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला. पण दुसरीकडे त्यांच्या विरोधकांनी संपूर्ण साताऱ्यात जल्लोष सुरु केला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते हे शशिकांत शिंदेविरोधात रिंगणात उतरले होते. ज्यांना भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही पाठिंबा दिला होता. दरम्यान, या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव केल्यानंतर राष्ट्रवादीच्या […]
ADVERTISEMENT

सातारा: राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला. पण दुसरीकडे त्यांच्या विरोधकांनी संपूर्ण साताऱ्यात जल्लोष सुरु केला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते हे शशिकांत शिंदेविरोधात रिंगणात उतरले होते. ज्यांना भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही पाठिंबा दिला होता.
दरम्यान, या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव केल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अक्षरश: जल्लोष केला. ज्यावेळी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे देखील त्यांच्यासोबत थिरकल्याचं पाहायला मिळालं. ज्याचा व्हीडिओ देखील आता समोर आला आहे.
यानंतर शिवेंद्रराजे यांनी माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांच्यावर बरीच टीका केली. पाहा शिवेंद्रराजे नेमंक काय म्हणाले.
‘दुसऱ्यावर पराभवाचं खापर फोडणं सोपं असतं मात्र पराभव का झाला? याचा आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. पंचवीस मतदारांनी आपणाला का डावलले यामध्ये स्वतःचा काहीच दोष नाही का, काही चुका नाहीत का? याचा थोडाफार अभ्यास किंवा आत्मचिंतन केलं पाहिजे.’