Satara bank Election : भाजपच्या साथीने राष्ट्रवादीच्या सहकारमंत्र्यांनी केला ‘करेक्ट कार्यक्रम’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इम्तियाज मुजावर, सातारा

ADVERTISEMENT

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या साथीने विजयाचा गुलाल उधळला आहे. बाळासाहेब पाटील यांनी माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा ८ मतांनी पराभव केला.

एका-एका मतांची बेरीज करत बाळासाहेबांनी भाजपच्या भोसले गटाला जवळ करत शिष्टाईतून लढवलेल्या निवडणुकीत उंडाळकरांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. या विजयामुळे बाळासाहेब पाटील यांचा अनेक वर्षानंतर जिल्हा बॅंकेत पुढच्या दाराने प्रवेश नक्की झाला आहे.

हे वाचलं का?

जिल्हा बँक निवडणूक: मला हद्दपार करण्याचा प्रयत्न, व्याजासकट परतफेड करणार – आमदार शशिकांत शिंदे

सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. बॅंकेच्या कऱ्हाड सोसायटी गटातून खुद्द सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे निवडणुकीसाठी उभे होते. त्यांच्या विरोधात अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर मैदानात उतरले होते. दोघांनीही आपले पत्ते उघड करत जास्तीत जास्त मतदान आपापल्या बाजूने व्हावे, यासाठी फिल्डींग लावली होती.

ADVERTISEMENT

सहकारमंत्र्यांनी बेरजेचे राजकारण करत थेट पारंपरिक विरोधक असलेल्या भाजपच्या भोसले गटालाच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मदतीसाठी साद घातली. त्यांनी भोसलेंबरोबर कृष्णाकाठच्या जेष्ठ आणि जाणत्या नेत्यांनाही मदत करण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर त्यांनी आणि त्यांच्या बंधूंनी भोसले गटाची सर्व मते आपल्याच पारड्यात पडावी यासाठी शेवटपर्यंत मोठे प्रयत्न केले.

ADVERTISEMENT

Satara District Bank Result : शशिकांत शिंदे एका मताने पराभूत; शंभूराजे देसाईंनाही धक्का

दरम्यान अॅड. उंडाळकर हे स्वतःच्या हिंमतीवर आणि कट्टर समर्थकांच्या जीवावर निवडणूक लढवत होते. राज्याचे सहकारमंत्रीच या निवडणुकीत उतरल्यामुळे कऱ्हाडची ही लढत राज्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. त्या गटातील जास्तीत जास्त मते आपल्यालाच मिळावी यासाठी सहकारमंत्री पाटील व उंडाळकर यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती.

दोन्ही नेत्यांनी विजयाचा दावा केल्याने मतदारांचा कौल कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होतं. अखेर मंगळवारी चित्र स्पष्ट झालं. बाळासाहेब पाटील यांना 74 मतं मिळाली, तर उदयसिंह पाटील यांना 66 मतं मिळाली. बाळासाहेब पाटलांनी 8 विजय मिळवल गुलाल उधळला.

कराड सोसायटी गटात 140 मते होती. आज सकाळी कराड सोसायटी गटातील मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यामध्ये सहकारमंत्री पाटील यांना 74 मते पडली. तर उंडाळकर यांना 66 मतांवरच रोखण्यात सहकारमंत्र्यांना यश आले. सहकारमंत्र्यांनी वर्षभरापासून नियोजन करुन उंडाळकरांचा करेक्ट कार्यक्रम केला. या निवडणुकीच्या निकालामुळे कराड तालुक्यातील भविष्यात होणाऱ्या बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांतही आता नवी समिकरणे दिसणार आहेत. त्याची झलकच या निवडणुकीच्या निकालात दिसुन आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT