मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी सत्तारांची बॅनरबाजी; बाळासाहेब आणि दिघेंच्या फोटोसह उर्दूत काय लिहिलंय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिंदे हे रविवारी आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात देखील जाणार आहेत. त्यापूर्वी याच सिल्लोड मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या स्वागतात उर्दूत मजकूर लिहलेले बॅनर्स झळकत आहेत. त्यामुळे उर्दूत असणारे बॅनर सध्या चर्चेचे विषय बनले आहे. या उर्दूत असलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिंदे हे रविवारी आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात देखील जाणार आहेत. त्यापूर्वी याच सिल्लोड मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या स्वागतात उर्दूत मजकूर लिहलेले बॅनर्स झळकत आहेत. त्यामुळे उर्दूत असणारे बॅनर सध्या चर्चेचे विषय बनले आहे. या उर्दूत असलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि स्वागतोत्सक म्हणून आमदार अब्दुल सत्तार यांचा फोटो आहे.
ADVERTISEMENT
वरील सर्वांच्या फोटोसह बॅनरवर उर्दू भाषेत काही मजकूर लिहण्यात आलेला आहे. वरील भागात एक शायरी लिहली आहे तर मध्यभागी एकनाथ शिंदे यांची प्रशंसा करणारे काही उर्दू वाक्य लिहण्यात आल्याचे बॅनरवर पाहायला मिळत आहेत. “तुफान कर रहा था मेरे अजम का तवाफ, दुनिया समज रही थी कशती भवर मे है” बॅनरवर उर्दू भाषेत अशी शायरी लिहण्यात आली आहे. “मुक्तलीफ तरक्कीयाती कामो के संगे बुनियाद और इफतेताह (उदघाटन)इस निसबत पर आने वाले महाराष्ट्र राज्य के हर वक्त काम करणे वाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब,” असे एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे विशेषणे लावण्यात आलेले आहेत, जे उर्दू भाषेत आहेत.
हा उर्दूतील बॅनर पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी 20 जून रोजी केलेल्या बंडात अब्दुल सत्तार हे देखील एक मंत्री होते ज्यांनी शिंदेसोबत बंड पुकारला होता. पहिलं सुरत मग गुवाहाटी आणि नंतर गोव्याला देखील अब्दुल सत्तार शिंदेंसोबत होते. अब्दुल सत्तार नेमके कोणत्या हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलेत? असा सवाल त्यांच्याबाबतीत उपस्थित केला जात होता. अशात आता सत्तारांच्या सिल्लोडमध्ये उर्दू भाषेत लावलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण आले आहे.
हे वाचलं का?
यावर आता विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.त्याचं कारण म्हणजे यापूर्वी इतर भाषेत लावलेल्या पोस्टर्स आणि बॅनर्समुळे अनेकदा वादांना तोंड फुटल्याचे पाहायला मिळाले आहे. मग ते आदित्य ठाकरे यांचे मतदारसंघ वरळी येथे ‘केम छो वरळी’ असे लागलेले बॅनर्स असो अथवा जनाब बाळासाहेब ठाकरे असा झालेला उल्लेख असो यावरून टीका टिपण्णी पहायला मिळाली आहे. अजूनपर्यंत या बॅनरवर विरोधकांकडून प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, त्यापूर्वी हा उर्दू भाषेतील बॅनर चर्चेचा विषय बनला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT