वर्षा गायकवाड यांचे वडील माजी खा. एकनाथ गायकवाड यांचं कोरोनानं निधन
मुंबई: मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांचं आज (28 एप्रिल) सकाळी 10 वाजेच्या सुमारास निधन झालं. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची (Corona) लागण झाली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचे […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांचं आज (28 एप्रिल) सकाळी 10 वाजेच्या सुमारास निधन झालं. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची (Corona) लागण झाली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनामुळे मुंबईतील काँग्रेसचा जुना-जाणता नेता हरपला आहे. (school education minister varsha gaikwads father and former mumbai ccongress president eknath gaikwad has died due to corona)
ADVERTISEMENT
एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वीच उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारदम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सीताराम येचुरी यांच्या अवघ्या 34 वर्षीय मुलाचं निधन, कोरोनाने घेतला बळी
हे वाचलं का?
एकनाथ गायकवाड यांची राजकीय कारकीर्द:
एकनाथ गायकवाड हे मुंबईतील काँग्रेसचा एक चेहरा होते. काँग्रेसमधील बराच मोठा गट एकनाथ गायकवाड यांना मानणारा होता. मुंबईतील धारावी हा त्यांचा मतदार संघ होता. जिथे त्यांनी आपली पकड मजबूत केली.1985 साली ते पहिल्यांदा विधान सभेवर निवडून गेले होते त्यानंतर, 1990, 99 असं दोनदा ते विधानसभेत निवडून गेले.
ADVERTISEMENT
1999 ते 2004 या आघाडी सरकारच्या काळात जे राज्याचे आरोग्य मंत्री होते. 2004 साली ते पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा म्हणजे 2009 साली देखील ते लोकसभेवर निवडून गेले. मात्र, 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, तरीही ते पक्षीय राजकारणात सक्रीय होते. 2017 साली त्यांची मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 2020 पर्यंत ते अध्यक्षपदी कायम होते.
ADVERTISEMENT
Covid 19 चा प्रादुर्भाव वाढल्याने SSC च्या परीक्षा रद्द-वर्षा गायकवाड
दरम्यान, 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ गायकवाड हे जायंट किलर ठरले होते. कारण त्यावेळी त्यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून पहिल्यांदाच काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि याचवेळी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा अनपेक्षितरित्या पराभव केला होता. त्यामुळे ते 2004 साली जायंट किलर ठरले होते.
मात्र, 2014 आणि 2019 साली शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांचा सलग दोनदा पराभव केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT