गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मारहाण प्रकरणात अटक, काही वेळात मिळाला जामीन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर IPC च्या कलम 365,324, 143, 148, 506 अन्वये ही कारवाई करण्यात आली. वर्तक नगर पोलिसांनी या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवला आणि त्यांना कोर्टापुढे हजर केलं. मॅजिस्ट्रेटनी त्यांना १० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

ADVERTISEMENT

अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. करमुसे यांनी हा आरोप केला आहे की जितेंद्र आव्हाड यांची माणसं माझ्या घरी आली. त्यांनी मला घरून जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेलं आणि तिथे मला मारहाण करण्यात आली. या सगळ्या प्रकारानंतर करमुसे यांनी तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली. मात्र कोर्टापुढे हजर करण्यात आल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. अखेर करमुसे मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना अटक असं ट्विट सोमय्यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

काय आहे हे प्रकरण?

ADVERTISEMENT

घोडबंदर रोड या ठिकाणी असलेल्या आनंद नगरमध्ये वास्तव्य करणारे अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. या पोस्टनंतर 5 एप्रिल 2020 ला करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांची माणसं त्यांच्या बंगल्यावर घेऊन गेली. करमुसे यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर करण्यात आलेल्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांना आज अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना दहा हजारांचा जामीन मिळाला आहे.

ADVERTISEMENT

सव्वा वर्षानंतर शेवटी कोर्टाने न्याय दिला. जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याचे आदेश दिले. ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली. अनंत करमुसेला न्याय मिळाला. आता अशा गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये. आम्ही राज्यपालांकडे जितेंद्र आव्हाड यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहोत असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

अनंत करमुसे यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्या वेळी निवासस्थानी आव्हाड उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करसुमे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटकही केली आहे. तर, अनंत करमुसेंविरोधातही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनंत यांच्या पत्नीला पोलिसांनी चौकशीसाठी पत्र पाठवलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT