ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटेंची तब्बेत बिघडली, पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल
ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यात एका विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी प्रकाश आमटे आले होते. त्यानंतर त्यांना ताप तसंच खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकाश आमटे यांच्या विविध तपासण्या सुरू झाल्या आहेत. त्यांना पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं […]
ADVERTISEMENT

mumbaitak
ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यात एका विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी प्रकाश आमटे आले होते. त्यानंतर त्यांना ताप तसंच खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रकाश आमटे यांच्या विविध तपासण्या सुरू झाल्या आहेत. त्यांना पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे. डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी सध्या संपर्क साधू नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.
प्रकाश आमटे हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसंच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांचे ते पुत्र आहेत. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचलं आहे.