गिरीश बापट फॅक्टर! शरद पवारांनी सांगितली रवींद्र धंगेकरांच्या विजयाची कारणं
Sharad Pawar । Ravindra Dhangekar victory । Kasba peth bypoll result 2023: भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. 28 वर्षानंतर हा मतदारसंघ काँग्रेसकडून गेला असून, रवींद्र धंगेकरांच्या विजयाच्या कारणाचा सध्या उहापोह केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना धंगेकर कसे विजयी झाले, […]
ADVERTISEMENT
Sharad Pawar । Ravindra Dhangekar victory । Kasba peth bypoll result 2023: भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. 28 वर्षानंतर हा मतदारसंघ काँग्रेसकडून गेला असून, रवींद्र धंगेकरांच्या विजयाच्या कारणाचा सध्या उहापोह केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना धंगेकर कसे विजयी झाले, याचं विश्लेषण केलं.
आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी (6 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी त्यांच्या सत्कार केला. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालाबद्दल काही मुद्दे अधोरेखित करत धंगेकरांच्या विजयामागची कारणं सांगितली.
रवींद्र धंगेकरांच्या विजयाची कारणे, शरद पवारांनी काय केलं विश्लेषण?
धंगेकरांच्या विजयाचं कारण सांगताना शरद पवार म्हणाले, “आम्हा लोकांचं असेसमेंट हे होतं की, यश मिळेल असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण, मला स्वतःला खात्री नव्हती. त्याचं मुख्य कारण नारायण, सदाशिव, शनिवार (पुण्यातील पेठा), याच्या खोलात जायची गरज नाही, पण तो भाजपचा गड आहे, असं अनेक वर्ष बोललं जातं.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला
कसबा पेठ निवडणुकीत बापट फॅक्टर ठरला महत्त्वाचा?
शरद पवार पुढे म्हणाले की, “दुसरी गोष्ट अशी की, तिथे अनेक वर्ष बापटांनी तिथलं प्रतिनिधीत्व केलं होतं. बापट हे स्वतः लोकांमध्ये मिसळत होते. बापटांचं वैशिष्ट्य हे होतं की, ते भाजप आणि त्यांचा परिवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. पण, पुण्यातील बिगर भाजप वर्गाशी मैत्रीचे संबंध त्यांचे होते. त्यामुळे साहजिकच आहे की, त्यांचं लक्ष ज्याठिकाणी अधिक केंद्रीत आहे, तो मतदारसंघ आपल्याला जड जाईल, असं असेसमेंट आमचं होतं. शेवटी शेवटी साधारणतः एक गोष्ट लक्षात आली की, त्यांच्या (गिरीश बापट) सल्ल्यानं निर्णय घेतले की नाही, याबद्दलची कुजबूज ऐकायला मिळाली. त्याचा अर्थ बापटांना डावलून, टिळकांना डावलून काही निर्णय घेतले. त्याचे काय परिणाम होतील, अशी एक चर्चा होती.”
ADVERTISEMENT
कसब्यातल्या मतदारांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुन्हा येऊ!’
ADVERTISEMENT
“कदाचित त्याचा फायदा होईल, अशी एक शंका होती, पण निवडणूक झाल्यानंतर मी माहिती घेतली. त्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची… की ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं. ती व्यक्ती वर्षानुवर्ष सामान्य लोकांमध्ये कसलीही अपेक्षा न करता काम करणारी होती”, असं शरद पवार कसबा पेठ निवडणुकीच्या निकालावर बोलताना म्हणाले.
रवींद्र धंगेकराचा बारामतीशी संबंध, पवारांनी काय सांगितलं?
“आणखी एक वैशिष्ट्ये की, माझी आणि त्यांची फार जुनी ओळख आहे असं नाही. तसा त्यांचा बारामतीशी संबंध आहे. पण, एक गोष्ट लोकांनी माझ्या लक्षात आणून दिली की हा उमेदवार असा आहे, हा कधी चारचाकीत बसत नाही. हा दोनचाकीवालाच आहे. त्यामुळे दोन पाय असलेले जे मतदार आहेत, त्या सगळ्यांचं लक्ष याच्याकडे आहे आणि त्याचा लाभ देखील होईल, हे जे ऐकायला मिळालं, ते शंभर टक्के खरं ठरलं. उमेदवार उत्तम, पक्षाचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीचे सगळे घटक मनापासून राबले. त्याचा परिणाम आहे, असं निरीक्षण आम्हा लोकांचं आहे”, असं भाष्य शरद पवार यांनी कसबा पेठ पोटनिवडणूक रवींद्र धंगेकरांच्या विजयाबद्दल केलं.
ADVERTISEMENT