Sharad Pawar: क्रूझ ड्रग्स प्रकरणात पवारांचा NCB ला ‘एक’ थेट सवाल, काय म्हणाले पवार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वसंत मोरे, बारामती

ADVERTISEMENT

मुंबईतील क्रूझवर ड्रग्स प्रकरणात करण्यात आलेली कारवाई ही बनावट आहे. असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील NCB च्या कारवाईवर काही सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला हळूहळू राजकीय वळण लागत आहे.

‘आरोपींना पकडण्याचा अधिकार हा साक्षीदारांना कसा काय असू शकतो?’ असा थेट सवाल शरद पवार यांनी एनसीबीला विचारला आहे. कालही अशाच स्वरुपाचा प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला होता. ज्यावर एनसीबीने एवढंच सांगितलं होतं की, ते सगळे स्वतंत्र साक्षीदार होते त्यामुळे त्यांना रेडमध्ये सामील करण्यात आलं होतं. मात्र आता याप्रकरणी पवारांनी पुन्हा एकदा बारामतीत पत्रकारांशी बोलताना अशाच स्वरुपाचा सवाल केला आहे.

हे वाचलं का?

पाहा शरद पवार ड्रग्स केसप्रकरणी काय म्हणाले:

‘मुंबईमध्ये एका बोटीवर ड्रग्स संदर्भात कारवाई करण्यात आली. मात्र, तेथे तथाकथित लोकांना पकडणारे काही लोक हे शासकीय यंत्रणेतील नव्हते. नंतर खुलासाही करण्यात आला की, ते शासकीय यंत्रणेतील नव्हते.‌ साक्षीदार म्हणून आम्ही त्यांना बोलावले होते. परंतु साक्षीदार बोलावणे ही एक वेगळी गोष्ट आहे किंवा पंचनामा करण्यासाठी असे लोकं बोलावतात हे स्वाभाविक आहे.’

ADVERTISEMENT

‘परंतु आरोपींना पकडण्यासाठी साक्षीदारांना अधिकार कसा असू शकतो? हे लोक राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. याचा अर्थ ते जेव्हा तथाकथित आरोपींना पकडून घेऊन जातात, तेव्हा याचा अर्थ असा की, तुम्ही शासकीय यंत्रणेत पक्षीय लोकांचा सहभाग करून घेतलेला आहे. आणि हे सर्वात वाईट आहे.’ असं म्हणत पवारांनी NCB च्या तपासाबाबतच काही सवाल उपस्थित केले आहेत.

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका आलिशान क्रूझवर 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला होता. क्रूझवर ड्रग पार्टी आयोजित होणार असल्याची माहिती एनसीबीला आधीच मिळाली होती त्यामुळे त्याच आधारे त्यांनी हा छापा टाकला असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, या छापेमारीक एनसीबी अधिकाऱ्यांच्या हाती बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही लागला. अनेक तासांच्या चौकशीनंतर आर्यन खानला अटक करण्यात आली. त्यानंतर कोर्टाने त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी सुनावली होती. पण आज झालेल्या सुनावणीत 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे.

Drug Case: ‘संपूर्ण ड्रग्स प्रकरणच बनावट’, अनेक Video-फोटो दाखवत राष्ट्रवादीचे खळबजनक आरोप

त्यामुळे आर्यनसह इतर सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. यानंतर स्पष्ट होईल की, आर्यन खानला कोर्टाकडून जामीन मिळणार की नाही.

मुंबईतील क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी सुरुवातीला किला कोर्टाने आरोपी आर्यन खान याच्यासह दोन आरोपींना एक दिवसासाठी NCB ची कस्टडी सुनावली होती. त्यानंतर तीन दिवसांची कस्टडी पुन्हा वाढवून देण्यात आली होती. पण आता ही कस्टडी वाढवून देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आता NCB पुढे नेमकी काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT