Sharad pawar : एवढं बोलण्यासारखं आहे, पण तुम्हालाही नोटीस येईल आणि मलाही -शरद पवार

मुंबई तक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज कोल्हापूरमध्ये (Kolhapur) देशातील काही मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी न्यायालयाकडून दिल्या जाणाऱ्या निकालांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोललो तर मलाही नोटीस येईल आणि तुम्हालाही, असं म्हणत पवारांनी भाष्य करणं टाळलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना शरद पवारांनी राजद्रोहाच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज कोल्हापूरमध्ये (Kolhapur) देशातील काही मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी न्यायालयाकडून दिल्या जाणाऱ्या निकालांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोललो तर मलाही नोटीस येईल आणि तुम्हालाही, असं म्हणत पवारांनी भाष्य करणं टाळलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना शरद पवारांनी राजद्रोहाच्या कलमाबद्दल भूमिका मांडली. राजद्रोहाचं कलम ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीत आणलं होतं. आता लोकशाही देशात लोकांना आपल्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आता केंद्राने पुनर्विचार करण्याची भूमिका माडणं चांगली बाब आहे, असं पवार म्हणाले.

Pawar vs Thackeray: अशी वक्तव्य लोकं ऐकतात, हसतात आणि सोडून देतात- पवारांना राजना टोला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल न्यायालयाने दिलेल्या आदेशावरही पवारांनी भाष्य केलं. ‘न्यायालयाने दिलेल्या आदेशाबद्दल लोकांच्या मनात गैरसमज असावा, असं माझं मत आहे. कारण न्यायालयाने असं म्हटलंय की, निवडणूक प्रक्रिया थांबवली होती. तिथून सुरू करा. १५ दिवसांत ही प्रक्रिया सुरू करा, असा न्यायालयाचा आदेश असावा असं मी समजतो.’

हे वाचलं का?

    follow whatsapp