मंत्रिमंडळ विस्तारावरून शरद पवारांचा एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना उपरोधिक टोला
भाजप-शिंदे गटाचं सरकार सत्तेत येऊन ३० जुलैला महिना पूर्ण होईल. मात्र, महिना लोटूनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यानं राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी शरद पवार यांनी स्थानिक […]
ADVERTISEMENT

भाजप-शिंदे गटाचं सरकार सत्तेत येऊन ३० जुलैला महिना पूर्ण होईल. मात्र, महिना लोटूनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यानं राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण, नव्या सरकारकडून जुन्या सरकारच्या निर्णयांना देण्यात आलेली स्थगिती आणि मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व्हावी, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांना स्थगिती
सत्तेत आल्यानंतर आपल्या धोरणानुसार निर्णय घेणं, याला काही आक्षेप घेत नाही. पण ज्या प्रकारचं सुरू आहे. जिथे काम सुरू आहे. टेंडर काढली आहेत. त्या सगळ्या गोष्टी थांबवणं, हे योग्य नाही.
‘त्या सात जणांमध्ये एकनाथ शिंदेही होते’; फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार भडकले