BMC Ward Reservation : यशवंत जाधवांसह ‘या’ दिग्गजांना शोधावा लागणार नवा वार्ड

मुंबई तक

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एससी, एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता २१९ प्रभागांसाठी आरक्षण सोडत आज जाहीर आली. सर्वोच्च न्यायालयाने बाठिया आयोगाच्या शिफारशींप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण देण्यास परवानगी दिल्यानंतर ओबीसी आरक्षण लॉटरी काढण्यात आली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट होता. मात्र, राज्य सरकारने बाठिया आयोगाचा अहवालानुसार न्यायालयात रिपोर्ट सादर केला. बाठिया आयोगाच्या शिफारशी मान्य करत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एससी, एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता २१९ प्रभागांसाठी आरक्षण सोडत आज जाहीर आली. सर्वोच्च न्यायालयाने बाठिया आयोगाच्या शिफारशींप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण देण्यास परवानगी दिल्यानंतर ओबीसी आरक्षण लॉटरी काढण्यात आली.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट होता. मात्र, राज्य सरकारने बाठिया आयोगाचा अहवालानुसार न्यायालयात रिपोर्ट सादर केला. बाठिया आयोगाच्या शिफारशी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने त्याप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका ओबीसी आरक्षणासह घेण्यास परवानगी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळून, तसेच यापूर्वी जाहीर करण्यात आलेलं सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण रद्द करुन, आज नव्याने ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.

बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज (२९ जुलै) एससी, एसटी प्रवर्गांचं यापूर्वी घोषित झालेलं आरक्षण वगळून २३६ पैकी २१९ प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. २१९ पैकी ६३ प्रभाग हे ओबीसी प्रवर्गासाठी सुटले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp