मोठी बातमी: शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? अजित पवार, जयंत पाटलांना दिल्लीत पाचारण
नवी दिल्ली: आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका पत्राच्या माध्यमातून अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तातडीने दिल्लीत चर्चेसाठी बोलावलं असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आता […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका पत्राच्या माध्यमातून अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तातडीने दिल्लीत चर्चेसाठी बोलावलं असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आता गृहमंत्री बदलले जाणार का चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. (sharad pawar will convene a meeting of ncp leaders and hold discussions with ajit pawar and jayant patil)
दुसरीकडे शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फोनवरुन चर्चा केली असल्याचं समजतं आहे. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचा देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता शरद पवार या सगळ्या प्रकरणाबाबत नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, आज (21 मार्च) संध्याकाळी 5 वाजता राजधानी दिल्लीत शरद पवार हे बैठक घेणार आहेत. यासाठी थोड्याच वेळात अजित पवार आणि जयंत पाटील हे रवाना होणार आहे. सध्या हे दोन्ही नेते पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत.