Congress president result : मतमोजणीदरम्यान शशी थरूर गटानं घेतला आक्षेप; निवडणूक अधिकाऱ्याकडे केली तक्रार
काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, शशी थरूर यांचे पोलिंग एजंट सलमान सोझ यांनी निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाची लेखी तक्रार काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे केली आहे. पंजाब, यूपी, तेलंगणा या तीन राज्यांतील निवडणुकीत हेराफेरीचा आरोप सलमान सोझ यांनी केला आहे.देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसला आज नवा अध्यक्ष मिळणार आहे. […]
ADVERTISEMENT

काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, शशी थरूर यांचे पोलिंग एजंट सलमान सोझ यांनी निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाची लेखी तक्रार काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे केली आहे. पंजाब, यूपी, तेलंगणा या तीन राज्यांतील निवडणुकीत हेराफेरीचा आरोप सलमान सोझ यांनी केला आहे.देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसला आज नवा अध्यक्ष मिळणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला मतदान झाले होते. ९,९१५ पैकी ९,५०० हून अधिक प्रतिनिधींनी मतदान केले होते.
24 वर्षानंतर गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यालयात मतमोजणी सुरू आहे. सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होतील. 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच पक्षाला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. याआधी सीताराम केसरी हे बिगर गांधी अध्यक्ष होते. काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात ६व्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे.
कधी-कधी झाल्या निवडणुका?