‘जितेंद्र आव्हाड, दबाव टाकू नका’, विनयभंग प्रकरणावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
रिदा रशीद यांनी जितेंद्र आव्हाडांवर विनयभंग केल्याचा आरोप केलाय. मुंब्रा पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिंदे गटातल्या नेत्या शितल म्हात्रे यांनी राजीनामा देण्याच्या इशाऱ्यावरून पलटवार केलाय. भाजप महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा रिदा रशीद यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केलाय. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांवर दुसरा गुन्हा दाखल झालाय. गुन्हा […]
ADVERTISEMENT

रिदा रशीद यांनी जितेंद्र आव्हाडांवर विनयभंग केल्याचा आरोप केलाय. मुंब्रा पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिंदे गटातल्या नेत्या शितल म्हात्रे यांनी राजीनामा देण्याच्या इशाऱ्यावरून पलटवार केलाय.
भाजप महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा रिदा रशीद यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केलाय. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांवर दुसरा गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतलीये. त्यावरून शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी दबाव टाकून नका म्हणत टीका केलीये.
शितल म्हात्रे म्हणाल्या, “आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळपासून मी आमदारकीचा राजीनामा देईन, अशा पद्धतीची बातमी चालतेय. मी एव्हढंच सांगेन की, जर एखाद्या महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन सांगितलं की, माझ्यावर विनयभंग झालाय असं मला वाटतं, तर तिची केस नोंदवून घेणं पोलिसांचं काम आहे.”
जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, ठाण्यात जाळपोळ; किरीट सोमय्यांनी काढलं जुनं प्रकरण