Tunisha Sharma Suicide : शीजान खान 69 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Tunisha Sharma Suicide Case : टीव्ही मालिका ‘अलीबाबा दास्तान-ए-काबुल’ची अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma)हिच्या आत्महत्येप्रकरणी जेलमध्ये असलेल्या अभिनेता शिजान खानला (Sheezan Khan) जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिजान खानला 1 लाख रूपयाच्या जात जामीन मिळालाय. यामुळे आता तो 69 दिवसांनंतर जेलबाहेर येणार आहे. शिजानला 26 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो जेलमध्ये होता आता त्याला जामीन मंजूर झाला आहे. अभिनेत्रीचे हे संपुर्ण आत्महत्या प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (sheezan khan granted bail in tunisha sharma case today walk out from jail)

ADVERTISEMENT

Shah Rukh Khan : पठाणने बाहुबली 2 ला पछाडलं! बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच

प्रकरण काय?

छोट्या पडद्यावरील 20 वर्षीय अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma)अभिनेता शिजान खानच्या (Sheezan Khan)वॅनिटी वॅनच्या वॉशरुमध्ये गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. एका सेटवर शुटींग दरम्यान 24 डिसेंबर 2022 ला ही घटना घडली होती. या घटनेनंतर तुनिशाच्या आईने शिजान आणि त्याच्या कुटूंबियांवर गंभीर आरोप केले होते. शिजानने तुनिशाशी ब्रेकअप केले होते. त्यामुळे तुनिशा डिप्रेशनमध्ये होती. तसेच शिजान तुनिशाला मारहान देखील करायचा, असे तुनिशाच्या आईने आरोप केले होते. तसेच शिजान खानने तुनिशाची फसवणूक केल्याचा आरोप आईने केला होता. या घटनेनंतर तुनिशा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 28 वर्षाचा अभिनेता शिजान खानला अटक करण्यात आली होती.

हे वाचलं का?

शिजान खान (Sheezan Khan) आणि तुनिशा शर्माची (Tunisha Sharma) भेट ‘अली बाबा’च्या सेटवर झाली होती. यावेळी लडाखमध्ये पार पडलेल्या शुटींग दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अनेक महिने एकमेकांना डेट केल्यानंकर शिजानने डिसेंबरमध्ये तुनिशाशी ब्रेकअप केले होते. या ब्रेकअपनंतर तुनिशा डिप्रेशनमध्ये गेल्याची माहिती आहे. आणि या डिप्रेशनमधूनच तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं.

Hrithik Roshan पुन्हा लग्न करणार? काय आहे व्हायरल ट्विटचं सत्य

ADVERTISEMENT

अभिनेत्याला जामीन

मुंबई उपनगरातील वसई कोर्टात हे प्रकरण होते. या कोर्टातील एडिशनल सेशन कोर्टचे जज आर डी देशपांडे यांनी शिजान खानला जामीन मंजूर केला आहे. 1 लाख रूपयाच्या जात मुचलक्यावर त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान शिजानच्या जामीनासाठीची कागदपत्रे सादर करण्यास उशीर झाल्याने आता तो आज रविवारी जेल बाहेर पडणार आहे.वसई कोर्टातील सर्व कागदपत्रांच्या बाबी पुर्ण करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आता तो जेलबाहेर येणार आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान शिजान खानला (Sheezan Khan) जामीन मंजूर झाल्याने तो आता बाहेर येणार आहे. त्यामुळे त्याला आता दिलासा मिळाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT